Ghaziabad Crime News Saam tv
देश विदेश

Ghaziabad Crime News : प्रियकराने विवाहित प्रेयसीला आधी भेटायला बोलावलं आन् नंतर जे घडलं ते भयंकर होतं…

Crime News : संपूर्ण घटना जवळच लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Shivani Tichkule

Ghaziabad Crime : गाझियाबादच्या विजयनगर पोलीस स्टेशन परिसरात 32 वर्षीय विवाहित महिलेची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केली आहे. महिलेला गंभीर अवस्थेत उपचारासाठी एमएमजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेवर गोळीबार केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्यात आरोपी पळताना दिसत आहे.  (Latest Marathi News)

पोलिसांनी (Police) आरोपीचा शोध सुरू केला आहे. ही घटना गोशाळा चौकी परिसरात घडली आहे. ही घटना काल (२८ मार्च) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. प्रियकर त्याच्या एका साथीदारासह महिलेला भेटायला गेला. यानंतर महिलेवर गोळी झाडून तिथून फरार झाला. ही घटना जवळच लावलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Crime News)

जखमी महिलेलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तिच्या ओळखीचा होता. एका लग्न समारंभात स्वयंपाकाच्या कामादरम्यान दोघांची भेट झाली. यानंतर दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. मात्र, काही भेटीनंतर तिने तिच्या प्रियकराला भेटणे बंद केले.

मात्र, आरोपीने सतत महिलेचा पाठलाग करत तिला फोन करण्यासाठी त्रास देत होता. मंगळवारी (२८ मार्च) आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले आणि तिच्यावर गोळी झाडली.

महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Rule Change: १ जुलैपासून एलपीजीच्या नियमात होणार मोठा बदल, या ग्राहकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Monday Horoscope : वैवाहिक जीवनातल्या अडचणी दूर होणार, ५ राशींची चांदीच चांदी होणार; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेची पूजा नेमकी किती वाजता करावी? जाणून घ्या शुभ-अशुभ वेळ

Maharashtra News Live Update: सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगावात जोरदार पाऊस

Crime: बायकोचे शेजारच्यासोबत अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT