कोरोनानंतर 'या' जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव, WHO चा इशारा Twitter/@WHOAFRO
देश विदेश

कोरोनानंतर 'या' जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव, WHO चा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेने मारबर्ग विषाणू आढळल्याच्या माहितीला दुजोरा देताना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जगभरात गेल्या दीड वर्षांपासून जास्त काळ कोरोना Corona या महामारीने थैमान घातले आहे. कोरोना या आजारामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र आता या संकटाला सामोर जात असतानाच, आणखी एक आजार पसरण्याचे संकेत जागतिक आरोग्य संघटने WHO कडून देण्यात आले आहेत.

मारबर्ग Marburg virus या विषाणूचा पहिला रुग्ण पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये आढळून आला आहे. मारबर्ग हा आजार इबोला आणि कोरोनासारखा संसर्गजन्य असल्याचे बोलले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मारबर्ग विषाणू आढळल्याच्या माहितीला दुजोरा देताना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

हे देखील पहा -

मारबर्ग या विषाणूचा प्रादुर्भाव कसा झाला याबाबाद तज्ञा याचे संशोधन करीत आहे. मारबर्ग हा विषाणू अतिशय धोकादायक आणि घातक आहे. कोरोना प्रमाणे हा आजार संसर्गजन्य आहे. आता कोरोनासारख्या या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्या आधीच याला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे झाले आहे.

वटवाघुळाने खाल्लेली फळं खाल्ल्यामुळे मारबर्ग विषाणू माणसांमध्ये पसरतो, असं जागतिक आरोग्य संघटने कडून सांगण्यात आले आहे.

या आजाराची लक्षणं ?
या वज्राची मुख्य लक्षणं ताप, डोकेदुखी आणि शरीरांतर्गत रक्तस्त्राव आहे. या आजाराचा मृत्यूदर २४ ते ८८ टक्क्यांमध्ये आहे. तसेच या विषाणूविरोधात प्रतिबंधक लस अद्याप बाजारात उपलब्ध नाही अशी माहिती जागतिक आरोग्य संघटने कडून देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT