Viral video shows stampede at Mansa Devi Temple in Haridwar; 6 devotees lose lives amid panic. Saamtv
देश विदेश

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Mansa Devi Temple Stampede Video: श्रावण महिन्यात हरी की पौडीपासून चंडी देवी आणि मनसा देवी मंदिरात भाविकांचा ओघ सतत असतो.रविवार आणि शनिवारी भाविकांची संख्या वाढत असते.

Bharat Jadhav

  • हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये अफवा पसरल्यानंतर चेंगराचेंगरी झाली.

  • या दुर्घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत.

  • अफवा शॉर्ट सर्किटची असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • व्हायरल व्हिडिओमध्ये भाविकांची घाई, गोंधळ आणि घबराट स्पष्टपणे दिसून येते.

हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला. मंदिराच्या पायऱ्यांवर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये शॉर्ट सर्किटची अफवा पसरली. त्यानंतर गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. सावन महिन्यात हरी की पौडीपासून चंडी देवी आणि मनसा देवी मंदिरात भाविकांचा ओघ सतत असतो. त्यात शनिवार आणि रविवार असला तर गर्दी वाढत असते.

आज रविवारी भाविकांची अलोट गर्दी होती. मनसा देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत होते त्याच दरम्यान शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली. त्यातून चेंगराचेंगरी झाली असून यात २५ जण जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना सकाळी ९ वाजता घडली. पवित्र श्रावण महिन्यात दररोजप्रमाणे भाविक हरि की पौडी येथे स्नान आणि ध्यान करत होते. या चेंगराचेंगरीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल झालाय.

स्नान केल्यानंतर भाविक मनसा देवी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी शिवालिक टेकडीकडे जात होते. मनसा देवी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी शिवालिक टेकड्यांमध्ये रोपवेची सुविधा आहे. त्याचबरोबर पायी जाण्याचा मार्ग आहे. शिवालिक टेकड्यांमध्ये पादचाऱ्यांसाठी एक मार्ग आहे परंतु या मार्गावरून मंदिर परिसरात जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. हजारो भाविक पायऱ्यांवरून मनसा देवी मंदिराकडे जात होते. या पायऱ्यांची रुंदी १२ फूट ते १६ फूट आहे. आणि जसजसे तुम्ही पुढे जाल तसतसा पायऱ्या अरुंद होत जातात.

भाविकांची गर्दी वाढल्यानंतर तेथील व्यवस्था कोलमडली. भाविकांची गर्दीमुळे तेथील दुकानांचे नुकसान झाले. आधी मिळालेल्या माहितीनुसार पायऱ्यावर थांबवलेल्या असंख्य भाविकांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे भाविकांमध्ये भीती पसरली. त्या भीतीतून ते सैरवैर पळू लागले. त्यात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. यात ६ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT