मध्य प्रदेशच्या मंदसौरमधून मोठी बातमी हाती आली आहे. कथित भाजप नेता मनोहरलाल धाकडला हायवेवर शारीरिक संबंध करणे भोवलं आहे. हायवेवर अश्लील कृत्य करणाऱ्या मनोहरलाल धाकडला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी धाकडला अटक करून पोलिसांनी गरोठ तुरुंगात पाठवलं आहे. काही दिवसांपूर्वी मनोहरलाल धाकडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. धाकडचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून मनोहरलाल धाकडवर टीकेचा भडीमार होत आहे. मनोहरलाल धाकडचं दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवरील अश्लील कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंदसौर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर कारजवळ महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचं कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं. हा व्हिडिओ २१ मे रोजी रात्री सोशल मीडियावर अपलोड झाला होता. या घटनेनंतर काँग्रेसने भाजपला घेरलं. मनोहरलाल धाकडला हायवेवरील अश्लील कृत्यामुळे तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
मनोहरलाल धाडकवरील कारवाईवरून उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याची पत्नी सोहनबाई वार्ड क्रमांक ८ ची जिल्हा पंचायत सदस्य आहे. पतीवर कारवाई केल्यानंतर त्याची पत्नी पक्ष सोडण्याची शक्यता आहे. मंदसौर जिल्हा पंचायतीत १७ सदस्यांपैकी ९ सदस्य भाजप समर्थक आहेत. तर ८ जण काँग्रेसचे समर्थक आहेत.
धाकडवर कारवाई केल्यानंतर त्याच्या पत्नीकडून कोणत्याही प्रकारचं वक्तव्य समोर आलेलं नाही. सोहन बाई धाकडने भाजपपासून दूर झाल्यास पक्षाला मोठा फटका बसू शकतो.धाकडच्या पत्नीच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसची ताकद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धाकडच्या पत्नीच्या राजीनाम्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.