Mann Ki Baat : मन की बात या कार्यक्रमाचा ३० एप्रिल रोजी १०० वा एपिसोड पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पंतप्रधान मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आणि यूट्यूब चॅनलवरून प्रसारित करण्यात आला होता. (Political News)
मनकी बात म्हणजे दुसऱ्यांच्या गुणांची पुजा करणे होय. समोर कोणीही असले तरी त्यांच्यातील चांगल्या गुणांची दखल घेतली पाहिजे. या कार्यक्रमाने मला नेहमीच सामान्य जनतेशी जोडून ठेवले. साल २०१४ मध्ये जेव्हा मी दिल्लीला आलो तेव्हा पाहिलं की, येथील कामाची सर्व पद्धत वेगळी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मनकी बातच्या १०० व्या एपीसोडमध्ये मोदींनी हरियाणाचे सुनिल जगलान यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, बेटी बचाव बेटी पढाओ या अभियानात सुनिल यांनी सेल्फी विथ डॉटर ही मोहिम राबवली होती. अनेक व्यक्तींनी यात सहभाग घेतला. यामुळे मुलींचे महत्व किती आहे हे नागरिकांना समजले, असं मोदी म्हणाले. तसेच सुनिल यांच्या कामाचे कौतुकही केले.
मन की बातमध्ये आतापर्यंत महिलांच्या कार्यावर बातचीत झाली आहे. या आधी आपण या कार्यक्रमात छत्तीसगडमधील महिलांविषयी चर्चा केली होती. या महिला स्वत: परिसरातील रस्ते, मंदिर अशा सर्व ठिकाणी स्वच्छत: करत आहेत, असा उल्लेख पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.
मन की बातच्या १०० व्या एपिसोडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मिरच्या मंजूर अहमद यांच्याशी देखील चर्चा केली. मंजूर अहमद यांचा पाटीवरील पेन्सीलचा व्यवसाय आहे. मनकी बातच्या कार्यक्रमामुळे त्यांच्या व्यवसायाचा आणखीन विकास झाला असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात म्हटले.
मन की बात हा कार्यक्रम एका माळेतील मोती प्रमाणे आहे. यातील प्रत्येक मोती एकमेकांना जोडून ठेवण्याचे काम करतो. या कार्यक्रमामुळे विविध भागातील व्यक्तींना त्यांच्या कार्याविषयी माहिती मिळते. तसेच प्रत्येक एपिसोड पुढील एपिसोडमधील व्यक्तींसाठी एक जागा निश्चित करून ठेवत आहे. मन की बात आज देशाची एक परंपरा झाली आहे. याचा मला मोठा आनंद आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.