Manish Sisodia Saam Tv
देश विदेश

Manish Sisodia: तुरुंगातून बाहेर येताच मनीष सिसोदिया अ‍ॅक्शन मोडवर, 'आप'ने दिली मोठी जबाबदारी

Manish Sisodia On Action Mode: मनीष सिसोदिया तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. शनिवारी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर ते आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत.

Saam Tv

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. शनिवारी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर ते आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत. मनीष सिसोदिया यांनी काही महिन्यांत होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी स्वीकारली आहे.

यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असून त्यात पक्षाचे सर्व मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.

येत्या सहा महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशातच आम आदमी पक्ष तयारीला लागलेला दिसत आहे. शनिवारी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनीष सिसोदिया यांनी त्यांना आतापासून तयारी सुरू करण्यास सांगितले होते. यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपचे डिपॉझिट जप्त होणार असल्याचा दावा आम आदमी पक्ष करत आहे. नीष सिसोदिया यांचा जामीन ही भाजपच्या पुढील विधानसभेत अनामत रक्कम जप्त करण्याची नांदी असल्याचे गोपाल राय म्हणाले होते.

दुसरीकडे मनीष सिसोदिया यांनीही भाजपला आव्हान देत म्हटलं की, मी भाजपला सांगू इच्छितो की ते व्होट शोधत राहतील, आजपासूनच सुरुवात करावी लागेल. दिल्लीच्या लोकांनो, हरियाणाच्या लोकांनो, ही लढाई फक्त तुमची नाही, ही लढाई सत्याची आणि देशाला वाचवण्याची आहे.

ते म्हणाले, ''देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे. हे भाजपचे लोक फक्त विरोधी नेत्यांना त्रास देत नाहीत, चंद्याच्या धंद्यात बड्या व्यावसायिकांना ते नोटिसा पाठवून तुरुंगात पाठवतात. ही हुकूमशाही नाही तर काय आहे? याच्या विरोधात लढावे लागेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT