Viral Video Saam Tv
देश विदेश

Viral Video : चाललंय काय? मेट्रो पुन्हा चर्चेत; आता थेट अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोची जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच दिल्ली मेट्रोमध्ये एका मुलीचा बिकिनी घालून प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

Shivani Tichkule

Viral Video : सध्या सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोची जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच मेट्रोमध्ये एका मुलीचा बिकिनी घालून प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अशा व्हिडिओंचा महापूर आला. 

काही व्हिडिओंमध्ये, जोडपे मेट्रोमध्ये चुंबन घेताना दिसत आहेत, तर काहींमध्ये ते एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. त्यानंतर आता दिल्ली मेट्रोचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण चालत्या मेट्रोमध्ये आंघोळ करत आहे. ही घटना अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

हा व्हिडिओ जुना असला तरी तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो आतापर्यंत 1 कोटी 40 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर हजारो लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मेट्रोमध्ये (Metro) बसलेला एक तरुण आधी शर्ट-पॅन्ट काढतो आणि मग सुटकेस उघडतो आणि त्यात साबणाचा फेस बनवतो. यानंतर, एका जरमधून पाणी काढतो आणि स्पंज ओले करतो. यादरम्यान तो शाम्पूचा वापर करतो. (Delhi News)

आंघोळ झाल्यावर तरुण सुटकेस बंद करतो आणि कपडे घालतो. यादरम्यान त्याच्या आजूबाजूला उभे असलेले प्रवासी हैराण झाले आहेत. त्याची ही कृती पाहून काही जण आपली जागा बदलतात. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका यूजरने म्हटलं की, 'आजच्या पिढीला काय झालंय माहीत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हे लोक काहीही करायला तयार होतात. त्याच वेळी, काही वापरकर्ते या व्यक्तीला धाडसी म्हणत आहेत तर काही त्याला मूर्ख म्हणत आहेत.

मेट्रोमध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. दरम्यान याआधीही अनेकवेळा मेट्रोचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया  देताना दिसत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakesh Bedi: धुरंधरमुळे आयुष्य पालटलं, 'या' अभिनेत्याला मिळणार डबल मानधन; कारण काय?

Maharashtra News Live Update: अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

Sweaty hands: हातांना सतत घाम येतोय? दुर्लक्ष नको, वाचा तुमचं शरीर तुम्हाला काय संकेत देतंय

Maratha Empire Map: आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला, शिवप्रेमींचा महामोर्चा

Moringa Powder Benefits For Hair: लांब आणि दाट केसांसाठी शेवग्याच्या पानांचे फायदे, घरीच करा सोप्या पद्धतीने वापर

SCROLL FOR NEXT