Madhya Pradesh Crime Saam Tv
देश विदेश

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशमध्ये एका व्यक्तीने महिलेची १३ वेळा चाकूने वार करत हत्या केली. त्यानंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत आत्महत्या केली. या घटनेमुळे मध्य प्रदेश हादरले.

Priya More

Summary -

  • मध्य प्रदेशमध्ये १३ वेळा चाकूने वार करत महिलेची हत्या करण्यात आली

  • आरोपी प्रीतम कुशवाह हा तिच्या घरी भाड्याने राहत होता

  • महिलेची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या

  • धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

मध्य प्रदेशमध्ये एका व्यक्तीने महिलेची निर्घृण हत्या करून आत्महत्या केली. या व्यक्तीने महिलेवर चाकूने १३ वेळा वार केला. त्यानंतर त्याने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत आत्महत्या केली. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये ही घटना घडली. हत्या करणारा व्यक्ती हा महिलेच्या घरात भाड्याने राहत होता. दुर्गाबाई कुशवाह असं हत्या झालेल्या महिलेचे नाव होते. तर प्रीतम कुशवाह असं ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गाबाई यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. त्याच्या छातीवर ९ वेळा, पोटावर ३ वेळा आणि मानेवर एकदा चाकूने वार करण्यात आले होते. ही घटना सोमवारी घडली होती. दुर्गाबाई यांचा नवरा आणि मुलगा घरामध्ये नव्हते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दुर्गाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.

प्रीतम कुशवाह हा दुर्गाबाईंना जवळच्या बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये साफसफाईसाठी घेऊन गेला. त्याने एका खोलीमध्ये नेऊन दुर्गाबाईंवर जीवघेणा हल्ला केला. त्याने चाकूने १३ वेळा त्यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. प्रीतम गेल्या वर्षभरापासून दुर्गाबाईंच्या घरी राहत होता. त्याने त्याच्या ३ मुलांची हत्या केली होती. या प्रकरणी त्याला १५ वर्षांची शिक्षा झाली होती. काही महिन्यांपूर्वी शिक्षा भोगून तो तुरूंगातून सुटून बाहेर आला होता.

तो दुर्गाबाईंच्या घरी राहत होता. पण दुर्गाबाई त्याला घर सोडण्यासाठी दबाव आणत होत्या. याच मुद्द्यावरून त्यांच्यात वाद होत होता. जेव्हा जेव्हा त्यांच्यात भांडण व्हायचे तेव्हा प्रीतम जेवण बंद करायचा आणि आत्महत्येची धमकी द्यायाचा. सोमवारी याच रागातून त्याने दुर्गाबाईंची हत्या केली आणि त्यानंतर त्याने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Shastra: या ५ गोष्टी चुकूनही कोणाला भेट देऊ नका; नातं तुटण्याची असते दाट शक्यता

Divyanka Sirohi Death: रील बनवताना खाली कोसळली; लोकप्रिय अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

पाणी जपूनच वापरा! उजनी, वैतरणा ते कोयना, जायकवाडी; राज्यातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा? अधिकृत आकडेवारी समोर

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

Blood group: 'या' ब्लड ग्रुपला हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो जास्त

SCROLL FOR NEXT