Delhi Crime  saam tv
देश विदेश

Delhi Crime : फादर्स डेच्या दिवशी बाप बनला हैवान; पोटच्या मुलीसोबत केलं भयंकर कृत्य

father kills daughter : फादर्स डेच्या दिवशी दिल्लीत एका व्यक्तीने मुलीसोबत हैवानी कृत्य केलं आहे. दिल्लीतीन एका व्यक्तीने मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : दिल्लीसहित देशभरातील तरुणांनी १६ जूनला फादर्स डे साजरा केला. अनेक तरुण-तरुणींनी वडिलांसोबत असणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अनेकांनी वडिलांसाठी खास पोस्ट देखील लिहिली. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत फादर्स डेच्या दिवशी एका बापाने पोटच्या मुलीसोबत भयंकर कृत्य केलं आहे. या बापाने मुलीची हत्या करून शेतात फेकलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणीचा मृतदेह रविवारी कंझावला चांदपूर गावात रक्ताच्या थारोळ्यात आढळला. या तरुणीवर वार केल्याचेही आढळले. ही घटना फादर्स डेच्या दिवशी घडली. तरुणीला दुसऱ्या समजातातील मुलासोबत लग्न करायचं होतं, असं सांगण्यात येत आहे.

बापाने केली मुलीची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४६ वर्षीय बापाला अटक करण्यात आली आहे. तसेच एका कॅब ड्रायव्हरलाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. रविवारी रात्री ८.५३ वाजता एक कॉल आला. त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यावेळी पोलिसांना तरुणीच्या गळा आणि पोटावर जखम आढळली. तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केलं.

बापाने कबुल केला गुन्हा

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'या प्रकरणानंतर पोलिसांनी तपासासाठी अनेक पथकांची स्थापना केली आहे. या प्रकरणांचं सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांकडून कॅबचाही तपास सुरु केला आहे. या प्रकरणात आरोपीने गुन्हा कबुल केला आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी सायंकाळी आरोपीने मुलीला मुलाच्या खोलीतून घेऊन गेला होता. त्यानंतर कॅबमधून नेताना बाप-लेकीचा वाद झाला. त्यानंतर कारचालकाला रस्त्याच्या मध्येच कार थांबवण्यासाठी सांगितली. त्यानंतर बापाने मुलीची शेतात हत्या केली. बापाने धारदार वार करून हत्या केली, असे आरोपीने पोलीस चौकशीत सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

राज्यसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये मोठा भूकंप होणार? अनेक नेते बदलणार पक्ष;बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

तुम्हीही दिवसभर एकाच जागी बसून काम करता? आरोग्यावर होऊ शकतात 5 गंभीर परिणाम; वेळीच घ्या काळजी

Thursday Horoscope: या 3 राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास; पैशांपासून कामाच्या संधीपर्यंत मिळणार मोठी खुशखबर!

Bike Tyre Pressure: कडक उन्हात बाईकच्या टायरमध्ये किती हवा असली पाहिजे?

SCROLL FOR NEXT