क्राईम Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! दारूच्या नशेत बकऱ्याऐवजी कापला माणसाचा गळा..

दारूच्या नशेत पशुबळी देताना बकऱ्याच्या जागी माणसाचा गळा चिरल्याची घटना घडली आहे.

वृत्तसंस्था

आंध्र प्रदेशातून बकऱ्याचा बळी देण्यासाठी एका व्यक्तीने बकऱ्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) चित्तूर जिल्ह्यात रविवारी संक्रांती उत्सवादरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक माणूस दारूच्या नशेत होता आणि बकरीला मारण्यासाठी चाकू धरत होता, त्याऐवजी त्याने जनावर पाळणाऱ्या एकाचा गळा चिरला आहे.

त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुरेश (वय 35) याला तेथील शासकीय रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. मदनपल्ले ग्रामीण मंडळाच्या वलसपल्ले येथे परंपरेचा भाग म्हणून जनावरांचा बळी देत ​​असताना हा प्रकार घडला. (Crime News)

हे देखील पहा-

गावातील लोक दरवर्षी संक्रांती उत्सवात प्राण्यांचा बळी देतात आणि स्थानिक येल्लम्मा मंदिरात अर्पण करतात. पोलिसांनी आरोपी बद्दल सांगितले की तो दारूच्या नशेत होता. अधिक तपास करत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT