Boyfriend-Girlfriend News Saam Tv
देश विदेश

Boyfriend-Girlfriend News : प्रेमाला माफी नाहीच! गर्लफ्रेंडसोबत पहिलीच डेट, तिच्या कृत्यानं तरूण चक्रावला; प्रेमप्रकरण थेट पोलीस ठाण्यात

Man Complaints Against Girlfriend : तरूण-तरूणी आपल्या जोडीदारासोबत किंवा नवीन जोडीदार शोधण्यासाठी डेटवर जातात.

कोमल दामुद्रे

Moscow Boyfriend-Girlfriend News :

प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. पण हे असलं आपल्या 'डिक्शनरी'त नाहीच, असाच काहीसा तोरा एका तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडच्या बाबतीत दाखवलाय. दोघे पहिल्याच डेटवर गेले.

गर्लफ्रेंडच्या एका कृतीनं तो चक्रावून गेला. आयुष्याचे धागे जुळण्याआधीच गुंतागुंत झाली आणि ती सुटण्याऐवजी तुटून गेली. चुकीला माफी नाही म्हणत या तरुणानं तिच्याविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तरूण-तरूणी आपल्या जोडीदारासोबत किंवा नवीन जोडीदार शोधण्यासाठी डेटवर जातात. त्यासाठी मग चांगलं रेस्टॉरंट, पार्क किंवा क्लब अशी ठिकाणं निवडतात. खाणंपिणं किंवा फिरण्याच्या बहाण्यानं एकमेकांच्या आवडीनिवडी किंवा परस्परांना जाणून घेतात. पण हे जाणून घेण्याच्या नादात एका प्रेमीयुगुलाचं फिस्कटलं. तरुणीच्या कृतीचा धसका घेतलेल्या तरुणानं थेट पोलीस ठाणे गाठलं आणि तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. मॉस्कोमध्ये हा प्रकार घडलाय.

कशावरून बिनसलं?

मॉस्कोतील २८ वर्षीय तरुणाच्या तक्रारीनुसार, ते दोघे पहिल्यांदाच डेटवर गेले होते. दोघांनी एकत्र जेवण केलं. १३, ७०० रुपये बिल झालं. पण बिल चुकतं करण्याची वेळ आली तेव्हा निम्मे पैसे तू दे असे तिला सांगितले. त्यावर ती संतापून निघून गेली आणि संपूर्ण बिल त्यालाच भरायला लागलं.

काही दिवसांपूर्वी या तरुणीशी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ओळख झाली होती. ओळख वाढल्यानंतर डेटवर जाण्याचा निर्णय घेतला. मॉस्कोच्या एका कॅफेत (Cafe) दोघेही गेले. दोघांनी एकत्र जेवण केलं. गप्पाटप्पा रंगल्या. सारं काही आलबेल होतं. पण जेवणाचं बिल टेबलावर आलं आणि सगळंच बिघडलं. बिलातील निम्मे पैसे तिला देण्यास सांगितले. त्यावेळी सर्वात जास्त तू खाल्लं आहेस असं म्हणून तिनं पैसे (Price) देण्यास नकार दिला आणि तावातावाने निघून गेली, असे या तरुणानं तक्रारीत म्हटलं.

तरुणीचा शोध सुरू

तरुणीच्या या कृत्यानं तरुणाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो तडक पोलीस ठाण्यात गेला. तिथं या तरुणीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तरुणीचा शोध सुरू केला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT