mamata banerjee Saam tv
देश विदेश

ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; सीआयडीचं पथक घरात पोहोचलं, काय आहे संपूर्ण प्रकरण?

mamata banerjee : माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या आहेत. सीआयडीचं पथक त्यांच्या घरात पोहोचलं आहे.

Vishal Gangurde

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का

ममता बॅनर्जी यांना बनवाट सही प्रकरणात पोलिसांची नोटीस

बनवाट सही प्रकरणावरून पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण फिरलं

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. कथित हस्ताक्षर प्रकरणावरून सीआयडीचं पथक थेट माजी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या निवासस्थानी पोहोचलं आहे. सीआयडी पथक वॉरंट घेऊन त्यांच्या कालीघाट येथील खासगी निवास्थानी धडकलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सीआयडीचं पथकाने आधीच तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांना नोटीस दिल्याची माहिती मिळतेय. आता त्यांना नोटीस देत असताना पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या दिल्लीत सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी गेल्या होत्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडी अधिकारी कालीघाट पोलीस स्टेशनचं एक पथक आणि महिला पोलीस कर्मचारी दुपारच्या सुमारास तृणमूल काँग्रेसच्या ३० बी हरिश चॅटर्जी मार्गावरील केंद्रीय कार्यालयात पोहोचले. तृणमूलचे शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या अर्जात विधानसभा अध्यक्षांना सादर केलेल्या ठरावावर काही तृणमूल काँग्रेसच्या आमदारांच्या बनावट सह्या केल्याचा आरोप आहे. या आरोपांतर्गत सीआयडीने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना नोटीस बजावली जात आहे.

सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसहित राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनाही नोटीस धाडली आहे. त्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी सीआयडीला दिलेल्या उत्तराच्या आधारावर पक्षाच्या कार्यालयाच्या परिसराची झडती घेण्याची परवानगी मागण्यात आली होती.

सीआयडी एका अधिकाऱ्याने सांगितलं की, अभिषेक बॅनर्जी यांनी जबाबात म्हटलं की, 'आमदाराच्या सह्या ३० बी हरीश चॅटर्जी मार्गावरील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात घेण्यात आल्या होत्या. या जबाबाच्या आधारे तपासासाठी आलो आहोत. परंतु पथकाला कार्यालय परिसरात प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे ऑफिस व्यवस्थापक आणि सीआयडी अधिकाऱ्यांशी शा‍ब्दिक वाद झाला'.

तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार सुभाशीष चक्रवर्ती यांनी माध्यामांना सांगितले की, 'अभिषेक बॅनर्जी यांच्या अनुपस्थितित सीआयडी पथकाला परिसरत प्रवेश करू दिला नाही. अभिषेक बॅनर्जी आल्यानंतर सीआयडी पथक कार्यालयाच्या परिसरात झडती घेऊ शकते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा

Fatty liver: लिव्हरवरची चरबी काढून टाकतील 'या' ५ भाज्या, आजपासून करा आहारात समावेश

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! मिळणार ₹18 लाख एरियर? जाणून घ्या गणित

Dahanu : १६व्या शतकातील 'हा' किल्ला आजही आहे जिवंत, तुम्ही कधी पाहिलाय का?

Black Tea for High Blood Pressure: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले रूग्ण ब्लॅक टी पिऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT