Kharge speech on exam reform bill in Rajya Sabha highlights saam tv
देश विदेश

तुम्ही लपून राहू शकत नाही, एक दिवस आम्ही तुम्हाला बाहेर आणू; मल्लिकार्जुन खरगेंचा PM मोदी-अमित शाहांना इशारा

Mallikarjun Kharge Warning Modi Shah Rajya Sabha Exam Bill Row: राज्यसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि पॅलेट गन वापरावरून सरकारला सवाल.

Omkar Sonawane

परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज (दि.30) राज्यसभेत मांडण्यात अले असून त्यावर आज सभागृहात चर्चा सुरू आहे. विरोधकांच्या वतीने मल्लिकार्जून खरगे यांनी शेरो शायरीच्या माध्यमातून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. विद्यार्थी रडत राहीले आणि पेपर चोरणारे हसत राहिले. तसेच ते म्हणाले की, नवीन विधेयकामुळे फारसा फरक पडणार नाही, कारण यामध्ये फक्त दंड आणि शिक्षेत वाढ करण्याची तरतूद आहे.

जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांना लाठीचार्ज केल्याच्या प्रकरणावरून कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका केली. या मुद्यावर ना पंतप्रधान बोलतात ना अमित शाह सभागृहात दिसतात, गृहमंत्र्यांनी खुलेपणाने आपली भूमिका मांडायला हवी. इतका मोठा राडा झाला तरी अमित शाह गप्प कात आहेत, असा आक्रमक सवाल त्यांनी केला. हजारो विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने संसदेकडे मोर्चा काढला होता. त्यांना सरकारशी संवाद साधायचा होता. मात्र, त्यांच्यावर लाठीमार, अश्रुधूर आणि पॅलेट गनचा वापर करण्यात आला. रेल्वे स्थानके आणि इंटरनेटही बंद करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला.

पॅलेट गनचा आदेश कोणी दिला?

खरगे म्हणाले, यासाठी जबाबदार कोण आहे, गृहमंत्री? विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि पॅलेट गन वापरण्याचा आदेश कोणी दिला? गृहमंत्र्यांनीच. त्यानंतर आक्रमक होत खरगे म्हणाले की बंद खोलीत तुम्ही माझं बोलणं ऐकत असाल, पण तुम्ही जास्त काळ लपून राहू शकत नाही. एक दिवस आम्ही तुम्हाला बाहेर आणू आणि जनतेसमोर उभं करू. यावर सत्ताधारी सदस्यांनी गोंधळ घातला.

विद्यार्थ्यांच्या ताकदीपुढे झुकावे लागले

गेल्या दोन महिन्यांपासून निर्माण झालेल्या परिस्थितीत देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि अखेर पंतप्रधानांना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं लागलं. विद्यार्थ्यांच्या ताकदीपुढे सरकारला झुकावं लागलं आणि खुर्ची जाण्याच्या भीतीने त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खड्ड्यांमुळे 5 नाशिककरांचे बळी गेल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग

शाळांमध्ये कोणत्या पदार्थांवर बंदी, वाचा संपूर्ण लिस्ट

600 कोटी रुपयांचं घबाड, 'ब्लॅक डायमंड सिटी'त ईडीची धाड; नोटांच्या बंडलांचा ढिगारा, बघा VIDEO

Delhi Protest: आंदोलनातील जखमींवर उपचार करा, पेलेट गन वापरण्याची SOP काय? सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारवर संतापले

शिंदेसेनेच्या नेत्याला सर्वात मोठा धक्का; आमदारकी रद्द होणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने खळबळ

SCROLL FOR NEXT