tmc split Saam tv
देश विदेश

ममता बॅनर्जी यांच्या TMC पक्षातून कोण बंडखोरी करणार? बंडखोर 19 खासदारांची यादी समोर

tmc split : ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षात उभी फूट पडली आहे. बंडखोर खासदारांची यादी समोर आली आहे.

Vishal Gangurde

पश्चिम बंगालच्या राजकारणात उलटफेर

तृणमूलच्या बंडखोर खासदारांची यादी समोर

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून बंडखोरांवर टीका

पश्चिम बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर १९ खासदारांची यादी समोर आली आहे. बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या कथित पत्रावर सह्या केल्या आहेत. त्यात काकोली घोष, जगदीश चंद्र बसूनिया यांच्या नावाचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

टीएमसीच्या बंडखोर खासदारांच्या यादीत कोणाची नावे आहेत?

काकोली घोष

जगदीश चंद्र बसूनिया

खलीलूर रहमान

युसूफ पठाण

अबू ताहीर खान

पार्थ भौमिक

बापी हलदर

सयानी घोष

मिताली बेग

दीपक अधिकारी

कालिपदा सोरेन

जून मालिया

अरुप चक्रवर्ती

डॉ. शर्मिला सरकार

शत्रुघ्न सिन्हा

आसित कुमार मल

शताब्दी रॉय

रचना बॅनर्जी

तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी आणि किर्ती आझाद यांनी मंगळवारी पक्षाच्या बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपशी संबंध आणि संकटसमयी पक्षाची साथ सोडण्याचा आरोप त्यांनी केला. बंडखोर खासदारांकडे समर्थन असताना ते थेट भाजपमध्ये प्रवेश का करत नाही, भाजप त्यांना स्वीकारणार नाही का? असा सवाल कल्याण बॅनर्जी यांनी केला.

तत्पूर्वी, बंडखोर खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी नेतृत्वातील गट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून एनडीएला समर्थन देणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. बंडखोर गटाने त्यांच्याकडे २० खासदार असल्याचा दावा केलाय. माजी खासदार सुखेदू शेखर राय यांनी टीका करताना म्हटलं की, बंडखोरांनी राजीनामा देऊन नैतिकता दाखवावी'.

कल्याण बॅनर्जी यांनी बंडखोर गटाला उद्देशून कथित पत्र लिहिताना त्यांनी नैतिकतेवर भाष्य करताना म्हटलं की, तुम्ही महत्वपूर्ण कागदपत्रे सार्वजनिक का करत नाही? बंडखोर खासदार भाजपसोबत काम करत आहे. बंडखोर नेत्यांनी शुभेंदू अधिकारी यांच्या केंद्रीय भूपेंद्र यादव यांची भेट घेतली, ही बाब बंडखोर खासदार हे भाजपसोबत काम करत असल्याचा पुरावा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT