arvind kejariwal and Bhagwant maan. saam tv
देश विदेश

India Politics : विधानसभा अधिवेशनाआधीच मोठा राजकीय भूकंप होणार; पंजाबमध्ये आपचे ३२ आमदार फुटण्याची शक्यता

Punjab Politics : पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. ३२ आमदार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यानं केल्यानं भविष्यात राजकीय भूकंप होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Nandkumar Joshi

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं दिल्लीची सत्ता गमावली असतानाच पंजाबमध्येही पक्षाला हादरे बसण्याची शक्यता आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते प्रताप सिंग बाजवा यांनी केलेल्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आम आदमी पक्षाचे ३२ आमदार संपर्कात असल्याचा दावा बाजवा यांनी केला आहे.

आम आदमी पक्षाचे ३२ आमदार काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक आहेत. ते संपर्कात आहेत, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा यांनी केला आहे. विधानसभा अधिवेशन सुरू होण्याआधीच बाजवा यांनी केलेल्या दाव्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पंजाबमधील सरकारनं कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. आमदारांना पक्ष बदलायचा आहे. महिलांना दर महिन्याला १००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, ते सुद्धा या सरकारने पाळले नाही. निवडणुकीत हे आश्वासन दिले होते, अशी आठवणही बाजवा यांनी करून दिली.

राज्यातील भगवंत मान सरकारला हे विधानसभा अधिवेशन फार दिवस चालू द्यायचं नाही. भीतीपोटी आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री बदलायचा आहे. भगवंत मान यांच्याऐवजी दुसऱ्या एखाद्याकडं राज्याचं नेतृत्व द्यायचं आहे, असा खळबळजनक दावाही बाजवा यांनी केला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एक बैठक बोलावली होती. त्यात पंजाबच्या सर्व आमदारांना बोलावण्यात आलं होतं. पण ही बैठक बोलावण्यामागचं कारण काही विशेष नव्हतं, असं आपनं स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे आम आदमी पक्षात फूट पडेल असं वृत्त होतं. त्यामुळं ही बैठक बोलावण्यात आली होती, असा दावा करण्यात येत आहे.

आम आदमी पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. दशकांपेक्षा अधिक काळ सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला धूळ चारून भाजपनं ४८ जागांवर विजय मिळवला होता. तर आम आदमी पक्षाला केवळ २२ जागांवरच विजय मिळवता आला होता. काँग्रेसला दिल्लीत एकही जागा जिंकता आली नाही. पण आपच्या पराभवानं काँग्रेसला पंजाबमध्ये नवी ऊर्जा मिळाल्याचं बोललं जात आहे.

पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, असा दावा काँग्रेस आणि भाजपने अलीकडेच केला होता. पंजाबमध्ये पोटनिवडणूक लढून त्यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हायचं आहे, असा दावा केला जात असला तरी, आम आदमी पक्ष आणि तेथील नेत्यांनी हा दावा खोडून काढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT