देश विदेश

BJP: अवैध संबंधासाठी पत्नीचा छळ; अद्दल घडवण्यासाठी दाजीची मदत, BJP नेत्याच्या मुलाचा गर्लफ्रेंडसोबतचा 'तो' व्हिडिओ व्हायरल केला अन्...

BJP Leaders Son Video: भाजप महिला नेत्या शुभम गुप्ता यांचा मुलगा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे तब्बल १३० अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

मैनपुरीमधील भाजप नेत्याच्या मुलाच्या अडचणीत वाढ होत असल्याचं चित्र आहे. शुभम गुप्ताचे गर्लफ्रेंडसोबतचे अनेक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले होते. तब्बल १३० आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करत व्हिडिओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली एकाला अटक केली आहे. आरोपी हा शुभम गुप्ताच्या नात्यातला असल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भाजप नेत्याचा मुलगा शुभम गुप्ताचे १३० आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओंमध्ये शुभम गुप्ता आपल्या गर्लफ्रेंडसोबत आक्षेपार्ह स्थितीत रोमान्स करत असताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेनं मैनपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शुभम गुप्ता यांची पत्नी शीतल गुप्ता, त्यांची बहीण आणि दाजी नीरज गुप्ता यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे नीरज गुप्ताला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

लग्नानंतर प्रेमसंबंध

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम गुप्ताचे शीतलसोबत २० नोव्हेंबर २०२१ साली लग्न झाले होते. सुरूवातीला सगळं काही अलबेल होतं. मात्र, काही महिन्यातच दुरावा येऊ लागला. शुभमच्या पत्नीनं आरोप केला की, लग्नानंतर शुभचे मैनपुरी शहरातील दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते. शारीरिक संबंध ठेवून शुभम आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवत असल्याचा आरोप त्याच्या पत्नीनं केला. तसेच मानसिक छळ करण्यासाठी व्हिडिओ पाठवत असल्याचं तिनं सांगितलं.

या घटनेनंतर महिलेनंही पती शुभम गुप्ता आणि त्याच्या आई विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून दोन्ही बाजूने तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सामुहिक योगासनांचा सराव

Vat Purnima 2026 : ना मैदा, ना गहू; यंदा वटपौर्णिमेला बनवा फणसाची पुरी, एक घास खाताच नवरोबा खुश

Diabetes control: आहारातील हे ३ बदल करतील मधुमेहाचा धोका कमी

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT