Mahua moitra secret second marriage with pinaki mishra X
देश विदेश

खासदार महिलेनं गुपचूप उरकलं दुसरं लग्न, पतीसोबतचे फोटो झाले व्हायरल

Mahua Moitra Marriage : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी दुसरे लग्न केले आहे. त्यांचे पती पिनाकी मिश्रा हे बिजू जनता दलाचे नेते, खासदार आहेत. महुआ आणि पिनाकी जर्मनीमध्ये एकत्र दिसले होते.

Yash Shirke

तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज खासदार महुआ मोईत्रा यांनी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. पिनाकी मिश्रा यांच्यासह महुआ मोईत्रा विवाहबद्ध झाल्या आहेत. पिनाकी मिश्रा देखील राजकारणी आहे. ते ओडिशामधील पुरीचे खासदार आहे. मिश्रा हे बिजू जनता दलाचे मोठे नेते आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महुआ मोईत्रा जर्मनीमध्ये पिनाकी मिश्रा यांच्यासोबत दिसल्या होत्या.

महुआ मोईत्रा यांचे लग्न डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉर्सन यांच्याशी झाले होते. लग्नाच्या काही कालावधीनंतर त्यांच्या घटस्फोट झाला होता. तीन वर्षांपासून महुआ मोईत्रा वकील जय अनंत देहदराय यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. ३ मे रोजी महुआ मोईत्रा आणि पिनाकी मिश्रा यांनी गुपचूप लग्न उरकल्याची माहिती समोर आली आहे.

एका महिन्यापूर्वी म्हणजे ३ मे रोजी महुआ मोईत्रा यांनी दुसऱ्यांदा लग्न केले. त्यांनी लग्नाबाबत मौन बाळगले. महुआ आणि पिनाकी यांचे जर्मनीत काही फोटो व्हायरल झाले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांच्या दुसऱ्या लग्नाचे गूढ उलगडले. महुआ मोईत्रा या कृष्णा नगरच्या खासदार आहे. महुआ यांचे वय ५० वर्ष आहे, तर त्यांच्या पतीचे, पिनाकी मिश्रा ६५ वर्षांचे आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या तडफदार नेत्या आणि खासदार महुआ मोईत्रा या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असतात.राजकारणात रोखठोक विधानांसाठी आणि तीव्र भूमिकेसाठी महुआ ओळखल्या जातात. दुसऱ्या लग्नामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. तिचे पहिले लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर ज्या वकील जय अनंत देहदराय यांच्यासोबत रिलेशनशिप होत्या. पण ते नातेदेखील संपुष्टात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरारमध्ये डंपर खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT