CM Devendra Fadnavis rides a bullet to Vidhan Bhavan, promoting fuel conservation and curbing VIP culture. saam tv
देश विदेश

मोदींच्या आवाहनानंतर VIP संस्कृतीला चाप, बचतीसाठी सरकारी कार्यक्रमांना कात्री

Maharashtra Fuel Saving Vip Culture Cuts Government Events: इंधन बचतीसाठी राज्य सरकारनं सरकारी कार्यक्रमांना कात्री लावण्याचा मोठा निर्णय घेतलाय. VIP संस्कृतीला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कसा पुढाकार घेतलाय ? मंत्र्यांना कोणते आदेश देण्यात आलेत?

Suprim Maskar

विधानभवनाचा परिसर नेहमीचं मंत्र्यांच्या ताफ्यामुळे गजबलेला असतो....मात्र विधानभवनात अचानक एक वेगळचं दृश्य पाहयला मिळालं...राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः बुलेट चालवत, हेल्मेट घालून विधानभवनाच्या रॉयल एन्ट्री घेतली...यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार स्वत: फडणवीसांसोबत बुलेटवर विधानभवनात आले..उपमुख्य़मंत्री एकनाथ शिंदेंनीही इलेक्ट्रीक कारमधून विधानभवन गाठलं...

काय आहेत मुख्यमंत्र्यांचे आदेश?

मंत्र्यांनी तत्काळ आपला वाहनताफा अर्ध्यावर आणावा. कोणत्याही स्थितीत पदाधिकारी, आमदार लवाजमा मागे घेऊन फिरणार नाही, हे निश्चित करावं. विदेश दौरे, खाजगी दौरे तात्काळ रद्द करावे... विशेष विमान, हेलिकॉप्टर प्रवास टाळावा... आठवड्यात एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरा...खात्यातील स्टाफच्या वाहनाचा आढावा घेऊन वाहनसंख्या कमी करा. जिल्हा, विभाग पातळीवरील अधिकाऱ्यांना मुंबईत किंवा इतर ठिकाणी न बोलवता व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी करून घ्यावे. पक्षांनीही होर्डिंग, फ्लेक्स आणि रोषणाई याचा वापर टाळावा... पुढील 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमाचं आयोजन टाळा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत...

सत्ताधारीच नव्हे तर विरोधकांनीही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. ठाकरेसेनेचे नेते थेट पक्ष कार्यालयाकडे पायी चालत निघाले. तर सत्ताधारी नाटकबाजी करत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. तर दुसरीकडे एक दिवस इंधन बचत करून काही होणार नाही असा टोला शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

दरम्यान सरकारी तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी आता सत्ताधारी नेत्यांकडून वेगवेगळे उपाय योजले जात आहेत.कोणी इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय निवडतयं तर कोणी ताफ्यातील गाड्या कमी करण्याचा निर्णय घेतयं...मात्र, प्रशासकीय खर्चात कपात करण्याचं हे 'मिशन बचत' प्रत्यक्षात किती दिवस चालणार आणि किती यशस्वी होणार हे पाहणं महत्तावचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

Monsoon Update 2026 : मान्सून सर्वात शेवटी कोणत्या राज्यात पोहोचतो? कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT