VIP treatment Mahakumbh 2025  Saam Tv
देश विदेश

Maha Kumbh 2025: महाकुंभमध्ये भाविकांसाठी 'व्हीआयपी ट्रिटमेंट '; मेळ्यात असणार विशेष सुविधा

VIP Treatment for Mahakumbh Mela 2025: महाकुंभाच्या मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये मोठी व्यवस्था आखण्यात आलीय. लाखो भाविकांना आणि व्हीआयपींसाठी एक खास सुविधा देण्यात येणार आहे.

Bharat Jadhav

प्रयागराजमध्ये मोठ्या भव्या रुपात महाकुंभचं आयोजन केलं जात आहे. यात लाखो भाविक येणार असून यात व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तीसुद्धा सहभागी होणार आहेत. मेळा प्राधिकारणाने या कुंभमेळ्यासाठी विषेश सुविधांची तयारी केली आहे. या सुविधा देण्यासाठी २४×७ कंट्रोल रूम, प्रोटोकॉल अधिकाऱ्यांची तैनाती आणि २५० तंबूची क्षमता असलेलं सर्क्रिट हाऊस जेथे अधिकाऱ्यांना राहण्याची सुविधा असणार आहे.

यासह पर्यटन विकास विभागाकडून ११० काटेजची टेंट सिटी आणि सेवा देणाऱ्यांच्या माध्यमातून २२०० काटेजची टेंट सिटी विकसीत केली जाणार आहे. तसेच नदीच्या घाटावर अंघोळ करण्यासाठी काही खास सुविधाही असणार आहेत. मेळ्यादरम्यान १५ केंद्रीय आणि २१ राज्य विभागाकडून छावण्या बनल्या जाणार आहेत. येथे विभाग अधिकाऱ्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आलीय. तसेच महाकुंभमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांच्या सुविधांची सोय करण्यात आलीय.

व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींसाठी एक कंट्रोल रुम तयार करण्यात आले असून हे २४ सक्रिय असणार आहे. या कंट्रोल रुममध्ये अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. महाकुंभमध्ये विशेष व्यक्तींसाठी एक मेळा क्षेत्रात ५ वेगवेगळ्या स्थानांवर सर्किट हाऊस बनवण्यात आलंय. या सर्किट हाऊसमध्ये २५० टेंटची क्षमता असेल. तर २२०० मध्ये काटेज असणार आहेत. याची बुकिंग असणार आहे, हे प्राधिकरणाच्या वेबसाइटवर देण्यात आलंय.

विभागानुसार कॅम्प आणि राहण्याची सोय

महाकुंभमध्ये राज्य सरकार एकूण ३६ विभागांतील अधिकाऱ्यांसाठी छावण्या बनण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये राहण्यासाठी काटेजची व्यवस्था असणार आहे. जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींसाठी २१ अतिथी गृहांची सोय करण्यात आलीय. यात ३१४ खोल्या असणार आहेत. महाकुंभच्या दरम्यान भाविकांना अंघोळ करण्यासाठी विशेष घाट तयार करण्यात आलेत. या घाटांवरून नदीत जेटी आणि मोटर बोटची सुविधा देण्यात आलीय. जेणेकरून भाविक सहगत्या अंघोळ करू शकतील. ही व्यवस्था काही विशेष भाविकांसाठी असणार आहे. जे जास्त वेळ घाटावर असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT