Massive Fire Breaks Out In Prayagraj Saam Tv
देश विदेश

Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण आग, परिसरात धुराचे लोट; अग्निशमन दल घटनास्थळी

Massive Fire Breaks Out In Prayagraj: प्रयागराज महाकुंभच्या सेक्टर -१९ मध्ये ही आग लागली. महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी असलेल्या लोखंडाच्या पूलाच्या खाली असलेल्या तंबूंना ही आग लागली आहे. या आगीमुळे घटनास्थळी गोंधळाचे वातावरण आहे.

Priya More

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण आग लागली आहे. आगीमध्ये अनेक तंबू, साहित्य जळून खाक झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज महाकुंभच्या सेक्टर -१९ मध्ये ही आग लागली. महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी असलेल्या लोखंडाच्या पूलाच्या खाली असलेल्या तंबूंना ही आग लागली आहे. आग लागल्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आहे. परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत. पूलाच्या खाली आग लागल्यामुळे पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. ही आग वाढतच चालली आहे.

महाकुंभाच्या ठिकाणी जेवण बनवत असताना सिलिंडरचा स्फोट झाला त्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही आग इतकी भीषण आहे की ती वाढतच चालली आहे. घटनास्थळावर तंबू असल्याने ही आग वाढत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावर रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत.

महाकुंभ मेळा परिसरातील सेक्टर-१९ येथील पंतून ब्रिज १२ येथे असलेल्या अखिल भारतीय धार्मिक संघटनेच्या श्रीकरपत्री धाम वाराणसीच्या शिबिरात आग लागली. छावण्यामध्ये ठेवलेले एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याची शक्यता आहे. घटनास्थळावर अधूनमधून सिलिंडर फुटत आहेत. या घटनेत ५० हून अधिक छावण्या आगीच्या भक्ष्यस्थानी आहेत. या आगीत शेकडो जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग सेक्टर २० च्या दिशेने पुढे सरकत आहे. गीता प्रेसही आगीच्या भक्ष्यस्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Papad Rassa Bhaji :गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT