Horrific Accident  Saam tv
देश विदेश

Horrific Accident : गाय वाचवताना घडली भयंकर दुर्घटना; भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये बाप-लेकाचा समावेश

Horrific Accident in Madhya pradesh : गाय वाचवताना अपघाताची घटना घडली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

मध्य प्रदेशच्या श्योपूर जिल्ह्यात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कार झाडाला धडकून भीषण अपघात झाला. रस्त्यावर आलेली गाय वाचवताना भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

कारमधील लोक राजस्थानच्या कोठपुतली भागात राहणारे होते. विजेंद्र जाट, हरिराम यादव, मुकेश यादव आणि हाबा सिंह गुर्जर असे मृतांची नावे आहेत. यामध्ये हरिराम यादव आणि मुकेश यादव हे पिता-पुत्र होते. चौघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकारी शशी तोमर यांनी सांगितलं की, गाय वाचवताना अपघात झाला. या दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मृतांचे नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. मृतकांचे नातेवाईक कृष्ण कुमार यादव यांनी सांगितलं की, 'आमच्या कुटुंबातील लोक अशोकनगरमध्ये डंपर चालवतात. कुटुंबाचं काही काम होतं. त्यामुळे ते मध्य प्रदेशमध्ये गेले होते.

देहात पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चारही जणांचा मृतदेह श्योपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी वाहनातील सर्व मृतदेह बाहेर काढले. जिल्हा रुग्णालयात मृतदेहांचं पोस्टमार्टम केलं जात आहे. अशोकनगरहून कोठपुतली परताना अपघाताना झाला.

पुण्यातील चाकण तळेगाव महामार्गावर अपघाताचा थरार

पुण्यातील चाकण तळेगाव महामार्गावरील खालुंब्रे येथे भीषण अपघाताची घटना घडली. महामार्गावरील खालुंब्रे येथील निसरड्या रस्त्यामुळे दुचाकीस्वाराला कंटेनरने चिरडल्याचा प्रकार घडला. त्यामुळे कंटेनर आणि दुचाकी तळेगावच्या दिशेने जात दुर्घटना घडली. तळेगावला जाताना दुचाकी अचानक कंटेनरच्या चाकाखाली आल्याने एक तरुण चिरडला गेला. तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांनी उपचारादरम्यान प्राण सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

IND vs ENG 3rd Test: लय भारी! शानदार रवींद्र जडेजा; बनवला ७२ वर्षांत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT