Anti rabies Saam Tv
देश विदेश

अचानक शेकडो लोक घेत आहेत अँटी रेबीज इंजेक्शन काय आहे कारण?

आतापर्यंत 700 लोकांना इंजेक्शन्स दिली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मध्य प्रदेशमधील (Madhypradesh) ग्वालियर मध्ये एका रुग्णालयात अचानक अँटी रेबीज (Anti rabies) इंजेक्शन घेण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली. अचानक एवढी लोकांनी इंजेक्शनसाठी रांगा लावल्याने डॉक्टरांचा गोंधळ उडाला. अँटी रेबीज (Anti rabies) इंजेक्शन हे फक्त कुत्रा चावल्यानंतरच दिले जाते. पण शेकडो लोकांतील एकालाही कुत्रा (Dog) चावला नव्हता,तरिही लोक इंजेक्शन घेण्यासाठी आले होते. डॉक्टरांनी (Doctor) याची माहिती घेतली, तेव्हा त्यांना समजले की, ग्वालियर मधील एका म्हैशीला कुत्र्याने चावा घेतला होता, यात त्या म्हैशीचा मृत्यू झाला होता. पण त्याआधी याच म्हशीच्या दुधापासून बनवलेला मठ्ठा अनेकांनी प्यायला होता.

या म्हैशीचा (Buffalo) मृत्यू कुत्रा चावल्यामुळे झाला, हे समजल्यानंतर लोकांनी घाबरुन अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी गर्दी केली. यावेळी शेकडो लोक या रांगेत थांबले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ग्वालियर जिल्ह्यातील चांदपूर येथील आहे. या लोकांना शरिरात विष पसरण्याची भीती आहे. एकाचवेळी शेकडो लोक अँटी रेबीजसाठी (anti rabies) रुग्णालयात आल्याने डॉक्टरांचा (Doctor) गोंधळ उडाला.

आतापर्यंत 700 इंजेक्शन्स दिली आहेत

'आतापर्यंत गावकऱ्यांना 700 इंजेक्शन्स देण्यात आली आहेत, इंजेक्शन कमी पडल्या त्या जवळपासच्या भागातून आणण्यात आल्या. आतापर्यंत सर्वजण ठिक असल्याची माहिती डॉ. अरविंद शर्मा (Doctor) यांनी दिली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सर्वात मोठी अपडेट! तब्बल ८० लाख लाडकीचा लाभ बंद, योजनेसाठी अर्जाची पुन्हा नोंदणी सुरू होणार का?

FYJC Admission 2026: अकरावी प्रवेशासाठी मोठा निर्णय! गुणपत्रक अन् शाळा सोडल्याचा दाखला नसतानाही मिळणार प्रवेश

Mumbai Rain Alert : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, 'या' शहरांना यलो अलर्ट जारी; वाचा हवामानाचा अंदाज

Famous Actress : एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आता रस्त्यावर मागतेय भीक, फोटो पाहून बसेल धक्का

Accident : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! कार ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT