Madhya Pradesh Crime News  Saam TV
देश विदेश

Crime News : भयंकर घटना! मटणावरून नवरा-बायकोमध्ये भांडण; वादात शेजाऱ्याचा गेला जीव

संतापलेल्या पतीने शेजाऱ्याच्याच डोक्यात काठीने प्रहार करून त्याला ठार केलं.

Satish Daud

Madhya Pradesh Crime News : मंगळवारी घरात मटण नको, या कारणावरून पती-पत्नीमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादातून पतीने पत्नीला मारहाण (Crime News) करण्यास सुरूवात केली. पती मारहाण करत असल्याने पत्नीने आरडाओरड केली. पत्नीची आरडाओरड ऐकून शेजारील व्यक्ती भांडण सोडवण्यासाठी आला. मात्र, संतापलेल्या पतीने शेजाऱ्याच्याच डोक्यात काठीने प्रहार करून त्याला ठार केलं.

एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल, असा हा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमधून उघडकीस आला आहे. बबलू असं मृत्युमुखी पडलेल्या शेजाऱ्याचं नाव असून याप्रकरणी पोलिसांनी पप्पू नामक आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी घरात मटण तयार करण्यावरून पप्पू आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून पप्पूने पत्नीला मारहाण करण्यास सुरूवात केली. पती मारहाण करत असल्याने पत्नीने मदतीसाठी आरडाओरड केली.

तिचा आवाज ऐकून शेजारी राहत असलेला बबलू नामक व्यक्ती मदतीसाठी धावला. मात्र, वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी का आला असं म्हणत, पप्पूने हातातील काठीने बबलूच्या डोक्यात वार केला. यामध्ये बबलू गंभीर जखमी झाला.

त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पप्पू हा फरार झाला होता. पोलिसांनी तातडीने शोध घेत त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT