Crime News x
देश विदेश

Shocking : पूजेच्या निमित्ताने घरात आला; तरुणीला धमकावून पळवून घेऊन गेला, आश्रमात ३ दिवस लैंगिक अत्याचार अन्...

Crime News : पूजा करण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या आरोपीने तरुणीने पळवून नेले. तिला धमकावले, सोबत येण्यासाठी भाग पाडले. तरुणीला आश्रमात नेऊन आरोपीने तिच्यावर तीन दिवस लैंगिक अत्याचार केले.

Yash Shirke

Crime : एका तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी या तरुणीच्या घरी पूजा करण्यासाठी आला होता. पूजा साहित्य विसर्जन करण्यासाठी घेऊन जाण्याच्या बहाण्याने आरोपीने तिचे अपहरण केले. पळवून नेल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अजूनही फरार आहे. सदर घटना मध्यप्रदेशमधील दातिया जिल्ह्यात घडली आहे.

पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या घरात धार्मिक पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तिच्याच घराजवळच्या परिसरातील एका तरुणाने पूजा आयोजित केली होती. पूजा संपन्न झाल्यानंतर तरुणी नदीत पूजा साहित्य विसर्जन करण्यासाठी तरुणासोबत गेली. एकटीच असल्याचा फायदा घेत आरोपीने तरुणीला पळवले. तू काही केलस तर तुझ्या घरच्यांच खरं काही नाही अशी धमकी आरोपीने तरुणीला दिली.

भीतीपोटी तरुणी आरोपीच्या बाईकवर बसली. आरोपीने तिला झाशी, आग्रा आणि नंतर बसने मथुरा येथे नेले. झाशी रेल्वे स्टेशनवरुन ते दोघे ट्रेनने आग्रा आणि नंतर बसने मथुरा येथे गेले. मथुरेला गेल्यानंतर एका आश्रमात भाड्याने खोली घेतली आणि तिच्यावर तीन दिवस लैंगिक अत्याचार केला. वारंवार विरोध करुन देखील आरोपीने पीडितेला सोडले नाही.

अत्याचार केल्यानंतर पीडितेला घेऊन आरोपी झाशीला आला. पीडितेला झाशीला काही दिवस मेडिकल कॉलेजजवळच्या एका खोलीत ठेवले. आरोपी तरुणीला उन्नाव शहरात सोडून पळून गेला. पीडितने लगेच पोलीस स्थानक गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

धक्कादायक! कागदोपत्रीच शाळा… ४० शिक्षकांची फसवणूक, हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

Vedika Karkal: १८व्या वर्षी मिस गोवा; कन्नड, कोकणी चित्रपटातून ब्रेक; कोण आहे वेदिका करकल?

ठाकरेंचे २ खासदार अचानक शिंदेंच्या खासदाराच्या घरी, नेमकं कारण काय? राज्यात भूकंप होणार?

Crime News: बायको अश्लील व्हिडीओ पाठवतेय आणि..., पत्नीच्या विचित्र मागणीमुळे नवरा हैराण, थेट पोलीस ठाण्यात पोहचला

SCROLL FOR NEXT