Police investigate a marriage dispute following allegations of concealed gender identity. 
देश विदेश

अरे बापरे! लग्नाच्या २५ दिवसांनंतर पत्नी दाढी करताना दिसली अन् पतीच्या पायाखालची जमीनच सरकली, पुढे काय घडलं?

Marriage fraud allegation : मध्य प्रदेशातील शाजापूर येथे लग्नानंतर २५ दिवसांनी पतीने पत्नीची लिंग ओळख लग्नापूर्वी लपवण्यात आल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Namdeo Kumbhar

लग्नानंतरच्या २५ दिवसांत असं काही घडेल याचा पतीने स्वप्नातही विचार केला नसेल. एका साध्या प्रसंगाने संपूर्ण संसाराचा पटच बदलून टाकला आणि एका सत्याचा उलगडा झाला. पत्नीच्या त्या सत्यामुळे पतीसह अख्ख्या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नानंतर महिन्याच्या आत पत्नीला दाढी (Shaving) करताना पाहून पतीला संशय आला. त्यानंतर उघड झालेल्या प्रकारामुळे पतीने पोलीस स्टेशन गाठले. पत्नी ट्रान्सजेंडर असल्याचा दावा त्याने केला आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये लग्नाच्या पंचवीस दिवसांनंतर ३२ वर्षीय तरुणाने आपली पत्नी ट्रान्सजेंडर असल्याचा दावा केला. लग्नापूर्वी तिची लैंगिक ओळख लपवल्याबद्दल सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. विवाहसंबंध टाळण्यासाठी वारंवार दिली जाणारी कारणे आणि त्यानंतर कुटुंबात वाढलेल्या संशयामुळे नवरदेवाने आपल्या पत्नीला जाब विचारला.या दाव्याची अद्याप पडताळणी व्हायची आहे, हे स्पष्ट करत पोलिसांनी २५ जुलै रोजी पतीच्या कुटुंबीयांमधील पाच सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शाजापूरमधील भाजी विक्रेता असलेल्या तरूणाने आरोप केला आहे की, हे लग्न एका शेजाऱ्यामार्फत ठरवण्यात आले होते. त्याने त्याच्या कुटुंबाची ओळख राजगड जिल्ह्यातील पाचोरे येथील एका संभाव्य वधूशी करून दिली होती. त्याच्या कुटुंबीयांना पुढच्या वर्षी मुलाचे लग्न करायचे होते. पण त्यांच्याकडून लवकर लग्न करण्याचा आग्रह धरला, असा त्यांचा दावा आहे. या जोडप्याने २९ जून रोजी एका मंदिरात हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. त्यांनी लग्नावर जवळपास ५ लाख रुपये खर्च केले आणि वधूच्या कुटुंबीयांना १ लाख रुपये रोखही दिले. तक्रारीनुसार, जोडीदाराने लग्नाच्या रात्री मासिक पाळी आल्याचे आणि दुसर्‍या दिवशी पोटदुखीचे कारण सांगून वैवाहिक संबंध टाळले.

२ जुलै रोजी पत्नी माहेरी परत गेली आणि २३ जुलै रोजी सासरच्या घरी परत आले. वराने पत्नीच्या नातेवाईकांकडून मारहाणीचा आरोप केला आहे. वधू परत आल्यानंतर लगेचच संशय निर्माण झाला, जेव्हा नवरदेवाच्या नणंदेने कथितरित्या वधूला दाढी करताना पाहिले.

यामुळे त्यांना जोडीदार ट्रान्सजेंडर असल्याचा संशय आला आणि लग्नापूर्वी ही माहिती लपवण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला. "ती व्यक्ती तृतीयपंथी आहे की नाही, याची पुष्टी केवळ वैद्यकीय तपासणीनंतरच होऊ शकते," असे कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी संतोष बघेला यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणात आरोप खरे ठरल्यास आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT