Lucknow Building Collapsed  
देश विदेश

Building Collapsed: औषध कंपन्यांच्या गोदामाची इमारत कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले

Lucknow Building Collapsed : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. ट्रान्सपोर्ट नगरमधील एक इमारत अचानक कोसळली.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडलीय. शहरातील ट्रान्सफोर्ट नगरमध्ये असलेली एक इमारती कोसळल्याची घटना घडलीय. ही इमारत खांबांवर उभारण्यात आली होती. इमारत कोसळताच सर्वत्र ढगारा पसरला. या इमारतीत अनेक औषधी कंपन्यांची गोदामेही असल्याचे सांगण्यात येते. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जातेय.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त झालेली इमारत शहीद पथापासून काही अंतरावर होती. या पथावरील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये असलेली इमारत शनिवारी सायंकाळी अचानकपणे कोसळली.या इमारतीच्या आजूबाजूला भरपूर पाणी साचले होते. त्यामुळे इमारतीचा पाया कमकुवत झाल्याचं सांगण्यात येत आहे. या इमारतीची देखभाल केली जात नव्हती. त्यामुळेच इमारत कोसळली असल्याचं म्हटलं जात आहे. इमारत कोसळल्याची दुर्घटना घडताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच पोलीसही पोहोचले. सध्या एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांना मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. लवकरच मदतकार्य सुरू करण्यात येईल.

अपघाताची माहिती मिळताच डीएम आणि महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहोचले. सध्या अग्निशमन दलाचे जवान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे सीएम योगी यांनीही अपघाताची दखल घेतलीय. सीएम योगी यांनी पोलीस-प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्यात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT