LPG Gas Cylinder  Saam tv
देश विदेश

LPG च्या नियमात पुन्हा बदल; आता ग्राहकांना आणखी पैसे मोजावे लागणार

LPG Gas Cylinder: LPG च्या नियमात पुन्हा बदल करण्यात आलाय. आता ग्राहकांना डिलिव्हरी शुल्कासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Vishal Gangurde

देशभरात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

आता छोट्या सिलिंडरच्या डिलिव्हरीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार

एलपीजीबाबत नवीन नियम जाणून घ्या

पश्चिम आशियातील तणावजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम जाणवू लागला आहे. तणावजन्य परिस्थितीचा परिणाम थेट भारतावर होत आहे. मागील काही दिवसांत गॅस सिलिंडरच्या मोठी किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आलं. व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरच्या दरातही वाढ पाहायला मिळाली. त्यानंतर आता सिलिंडरच्या होम डिलिव्हरीसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, एजन्सीकडून आता छोटे सिलिंडर घरपोच मिळणार आहेत. परंतु प्रत्येक सिलिंडर रिफिलसाठी २५ रुपये अतिरिक्त डिलिव्हरी शुल्क द्यावे लागणार आहे. ग्राहक कोणत्याही इंडेन गॅस वितरक, इंडियन ऑइल रिटेल आउललेट, सुपरमार्केटमधून छोटे सिलिंडर खरेदी करू शकतात. देशभरातील विविध अधिकृत विक्री केंद्रावर सिलिंडर रिफिलची व्यवस्था केली जाऊ शकते.

भारतात छोट्या सिलिंडरसाठी पत्ता सांगण्याची गरज नसते. तुम्ही आधारकार्ड दाखवून छोट्या सिलिंडरसाठी कनेक्शन घेऊ शकता. तुम्ही एजन्सीतून छोटा सिलिंडर खरेदी केला, काही दिवसांनी तुम्हाला परत करायचा असेल. तर एजन्सीला सिलिंडर पुन्हा दिल्यास ५०० रुपये मिळू शकतात.

होम डिलिव्हरी शुल्कात वाढ

भारतात व्यावसायिक सिलिंडरसहित छोट्या सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. ५ किलो गॅस सिलिंडरची किंमत ११ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आता बाजारात छोट्या सिलिंडरची किंमत ८२१.५० रुपये इतकी करण्यात आली आहे. तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ४२ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत ३११३.५० रुपये इतकी झाली आहे.

भारतात १ मे रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ९९३ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तर घरगुती सिलिंडरचा दर ९९३ रुपयांवर स्थिर आहे. मार्च महिन्यात घरगुती सिलिंडरचा दर ६० रुपयांनी वाढवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boy Death case : नैसर्गिक मृत्यू की खून? अडीच महिन्यांनंतर गणेशचा पुरलेला मृतदेह काढला बाहेर, गूढ उकलणार

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये नवा ड्रामा; घरच्यांना भेटण्यासाठी प्रियाने रचला कट, अर्जुन-आश्विनने ऐनवेळी मोडला डाव

Maharashtra News Live Update: निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग; नितीन भुतडांची इंद्रनील नाईक, राजू तोडसाम यांच्याशी भेट

Kalyan : चार पदरी पुलाच्या कामावरून वाद पेटला; KDMC च्या कारवाईदरम्यान उडाला मोठा गोंधळ, नेमकं कारण काय?

Pune Fort : जुन्नरच्या डोंगररांगांतील अभेद्य किल्ला, 'हे' ठिकाण जपतंय ऐतिहासिक ठेवा

SCROLL FOR NEXT