LPG rules changes  Saam tv
देश विदेश

LPG गॅस सबसिडीच्या नियमात मोठा बदल; अनुदानित सिलिंडरची संख्या ९ वरून ४ वर,उज्ज्वला लाभार्थ्यांना झटका

LPG gas rules : LPG गॅस सबसिडीच्या नियमात मोठा बदल करण्यात आलाय. अनुदानित सिलिंडरची संख्या ९ वरून ४ वर करण्यात आलीय.

Vishal Gangurde

LPG सिलिंडरच्या नियमात मोठा बदल

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना बसणार झटका

अनुदानित सिलिंडरमध्ये केली कपात

LPG गॅस सबसिडीच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका बसणार आहे. सरकारने अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या संख्या १२ वरून ९ त्यानंतर ४ केली आहे. आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक अनुदानित ४ सिलिंडर मिळणार आहेत.

पश्चिम आशियामध्ये अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एलपीजीच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत युद्धामुळे एलपीजीच्या किंमतीत ४६ टक्क्यांनी महागला आहे.

जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती आणि गॅसच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. गॅसच्या किंमती वाढल्याने भारतातील घराघरात स्वयंपाकासाठी लागणारा एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढू लागल्या आहेत.

भारतातील पेट्रोलियम उत्पादनाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार सुरू असताना केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅसची किंमती नियंत्रणात ठेवल्या होत्या. परंतु आज सरकारने एलपीजी गॅसच्या नियमात बदल करून सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे वार्षिक सिलिंडरमध्ये कपात केली आहे. लाभार्थ्यांना प्रति सिलिंडरमागील ३०० रुपयांची अतिरिक्त सबसिडी थेट बँक खात्यात जमा व्हायची. ही सूट आता केवळ ४ सिलिंडरवर लागू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अनुदानित सिलिंडर केवळ ६४२ रुपयांना मिळणार आहेत. भारतात एकूण १०.५८ कोटींहून अधिक उज्ज्वला कनेक्शन आहेत. सरकारच्या मते, अनुदानित सिलिंडर इतर देशाच्या तुलनेत ६० टक्के स्वस्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: चेहरा खूप ड्राय झालाय? मग नॅचरल मॉइश्चराझरसाठी आठवड्यातून २ वेळा लावा हा फेसपॅक

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये खासगी शाळेच्या गोडाऊनला आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

पार्लरसारखी चमकदार त्वचा दिसेल घरी! रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'हे' तेल

BKC मधील स्कायवॉक कधी खुला होणार? अधिकृत तारीख आली समोर

Crime News: आठवीतील विद्यार्थिनीला बळजबरी दारू पाजली; नंतर हॉटेलमध्ये घेऊन गेले अन्... धक्कादायक कृत्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT