Long queues of citizens waiting for cylinders outside gas agencies due to lack of online booking. saam tv
देश विदेश

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइननेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

LPG Booking Why Cylinder Booking Is Not Working: सरकारने एलपीजी गॅसची कोणतीही कमतरता नसल्याचा दावा केला आहे. तरीही अनेक ग्राहकांना एलपीजी सिलिंडर ऑनलाइन किंवा ऑफलाइन बुक करता येत नाहीये. बुकिंगच्या समस्येमागील कारण आणि गॅस एजन्सींसमोर लांब रांगा का आहेत याचे कारण अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

Bharat Jadhav

  • अनेक शहरांमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये अडचणी.

  • गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांब रांगा लागल्या.

  • सरकारचा दावा – एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध.

सरकारकडून गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात अनेक भागांत ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. बुकिंग करूनही गॅस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना गॅस एजन्सीसमोर तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पहाटेपासूनच गॅस एजन्सी कार्यालयांबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी होतेय. आता या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नवी अपडेट दिली आहे.

सरकार गॅस सिलिंडरचा तुटवडा नसल्याचं सांगत आहे, तर दुसरीकडे ऑनलाइन सिलिंडर बूक करण्याचा प्रयत्न केला तर ग्राहकांचे बुकिंग होत नाहीये. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी एन्सजीसमोर रांगा लावल्या आहेत. ऑनलाइन बुकिंगची प्रक्रिया पूर्ण होत नाही. दोन-दोनदा, तीन-तीनदा प्रयत्न करूनही बुकिंग होत नसल्यानं ग्राहक त्रासले आहेत. परंतु ग्राहकांनी त्याबाबत चिंता करून नये. सिलिंडर बुकिंग का होत नाहीत त्यावर नवा खुलासा सरकारकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गॅस पुरवठ्याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.

LPG गॅसची कोणतीही कमतरता नाही, काँग्रेस पक्ष लोकांच्या मनात भीती तयार करत असल्याचा, आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. दरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन सिलिंडर का बूक होत नाही याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांनी दिली आहे.

आम्हाला विविध ठिकाणाहून आणि स्त्रोतांकडून गॅस सिलिंडर बुक करता येत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, शहरी भागात, शेवटच्या डिलिव्हरी आणि पुढील बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर अनिवार्य आहे आणि ग्रामीण भागात, हे अंतर ४५ दिवसांचे आहे. जर तुम्ही हा कालावधी संपण्यापूर्वी सिलिंडर बुक करण्याचा प्रयत्न केला तर बुकिंग पूर्ण होणार नाही, असं मार्केटिंग आणि ऑइल रिफायनरीचे सचिव सुजाता शर्मा म्हणाल्या.

कृपया तुमच्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या डिजिटल बुकिंग साधनांचा वापर करा. यामध्ये आयव्हीआरएस, एसएमएस बुकिंग, व्हॉट्सअॅप बुकिंग आणि ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (ओएमसी) प्रदान केलेल्या मोबाइल अॅप्लिकेशन्सचा समावेश आहे. वितरकांना प्रत्यक्ष भेट देण्याची, रांगेत उभे राहण्याची आणि नंतर सिलिंडर बुक करण्याची किंवा डिलिव्हरी घेण्याची आवश्यकता नाही. आमच्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी भूतकाळात सातत्याने तुमच्या घरी थेट सिलिंडर पोहोचवले आहेत. ते असे करत राहतील. म्हणून घाबरण्याची अजिबात गरज नसल्याचं त्या एएनआयशी बोलताना म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या मनपुर वर्तुळात वनपालाचा होरपळून मृत्यू

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

SCROLL FOR NEXT