Madhya Pradesh High court News AI image
देश विदेश

Court News : परपुरुषाशी शरीरसंबंध नाहीत, तोपर्यंत बायकोनं व्याभिचार केल्याचं मानता येणार नाही : हायकोर्ट

Madhya Pradesh High Court News: पत्नीचे परपुरुषासोबत शारीरिक संबंध नाहीत, तोपर्यंत पत्नीने त्याच्याबद्दलचे प्रेम हे व्याभिचार मानला जाऊ शकत नाही, असं एका प्रकरणात न्यायालयानं म्हटलं आहे.

Nandkumar Joshi

Madhya Pradesh: जोपर्यंत परपुरुषासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित होत नाहीत, तोपर्यंत तिचे त्याच्याप्रती असलेले प्रेम किंवा स्नेह म्हणजे तिने पतीशी व्याभिचार केला असं मानता येणार नाही, असा निर्वाळा मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं दिला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जीएस अहलूवालिया यांनी एका प्रकरणात सुनावणी करताना ही टिप्पणी केली आहे.

पतीचा युक्तिवाद फेटाळला

मध्य प्रदेशातील कनिष्ठ न्यायालयानं एका प्रकरणात पत्नीला पोटगी देण्याचे आदेश तिच्या पतीला दिला होता. त्या आदेशाला संबंधित व्यक्तीनं मध्य प्रदेश उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याची पत्नी अन्य व्यक्तीवर प्रेम करते, त्यामुळं तिला पोटगी मिळवण्याचा कुठलाही हक्क नाही, असे म्हणणे त्याने याचिकेत मांडले होते.

वडिलांनी संपत्तीतून बेदखल केले, तसेच कमी पगाराच्या नोकरीचा हवाला देत छिंदवाडा येथील व्यक्तीनं मध्य प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पत्नीला पोटगी देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात त्याने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. सासर सोडून माहेरी राहत असल्याचा, तसेच अन्य पुरुषासोबत बोलत असल्याचं सांगत त्याने पत्नीला पोटगी मिळवण्याचा अधिकार नाही, असं सांगितलं होतं.

पोटगी द्यावी लागणार

पत्नीला पोटगी देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयानं कायम ठेवला. पत्नीला पोटगीच्या स्वरुपात ४००० रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. आता उच्च न्यायालयानं तो निर्णय कायम ठेवल्याने पतीला पोटगी द्यावीच लागणार आहे. पत्नीला कोणत्याही परिस्थितीत पोटगी द्यावीच लागेल, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

पतीने कमी उत्पन्नाचा केलेला युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास सक्षम नसल्याचे माहीत असूनही एखाद्या मुलीशी लग्न केले आहे तर, तो स्वतःच याला जबाबदार आहे. जर तो शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, तर त्याला आपल्या पत्नीचं पालनपोषण करण्यासाठी आणि पोटगीची रक्कम देण्यासाठी कमवावंच लागेल, असंही न्यायालयानं नमूद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT