Girlfriend Interrupts Wedding in UP Google
देश विदेश

Love Affair : लग्नमंडपात नवऱ्याची गर्लफ्रेंड पोहचली, ५ वर्षांपासून सोबत, मुलगी आमचीच, मग...

Girlfriend Interrupts Wedding in UP : उत्तर प्रदेशातील लग्न सोहळा त्या वेळी थांबवण्यात आला, जेव्हा नवरदेवाच्या प्रेयसीने चिमुकल्या मुलीसह लग्नमंडपात प्रवेश करून, 'हा माझा पती आहे' असा दावा केला. यामुळे वधूने लग्न करण्यास नकार दिला.

Namdeo Kumbhar

Love Affair Stops Marriage : लग्नमंडपात लगीनघाई सुरू होती. वऱ्हाडी मंडळी उत्साही आणि आनंदी होते. अक्षता वाटला जात होता. नवरा-नवरी लग्नाच्या विधी करण्यासाठी तयार झाले होते. त्याचवेळी अचानक चिमुकल्या मुलीला घेऊन एक तरूणी लग्नात पोहचली अन् नवरदेवाकडे गेली. नवरदेव आणि माझं ५ वर्षांपूर्वीच लग्न झालेय, ही मुलगी आमचीच असल्याचा दावा त्या मुलीने केला अन् लग्नाच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. उत्तर प्रदेशमध्ये लग्नामध्ये हा सर्व प्रकार घडलाय. मुलीचे नाव नेहा प्रजापती असे आहे. तर मुलाचे नाव प्रभाकर असे आहे.

प्रभाकर याचे जालौनमधील कोंच येथे लग्न होते. लग्नाच्या विधी सुरू झाल्यानंतर कथित प्रेमिका नेहा मांडवात अचानक आली अन् एकच गोंधळ घातला. नेहा चिमुकलीसोबत लग्नाच्या मांडवात आली अन् नवरेदव प्रभाकर याच्यासोबत ५ वर्षांपूर्वी लग्न झाल्याचे तिने सांगितले. आमची एक मुलगीही आहे, पाच वर्षांपासून एकत्र राहात असल्याचे तिने लग्नात उपस्थित असणाऱ्या वऱ्हाडी मंडळीना सांगितले. मग काय... गोंधळ उडाला अन् प्रभाकर याचे लग्न मोडलं गेलं.

कोंच येथील आशीर्वाद हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार घडला. प्रभाकरच्या लग्नाची या ठिकाणी जोरदार तयारी सुरू होती. लग्नाच्या विधी सुरू असतानाच नेहा चिमुकल्या मुलीसोबत मंडपात शिरली आणि प्रभाकरवर गंभीर आरोप केले. नेहा म्हणाली की, 'ती आणि प्रभाकर गेल्या पाच वर्षांपासून एकत्र राहत होते आणि त्यांची एक मुलगी आहे.' नेहाने केलेल्या या दाव्याने वधू आणि तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला. उपस्थित लोकांमध्येही खळबळ उडाली. नेहाच्या आरोपांनंतर वधूने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न समारंभ तिथेच थांबला.

या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले. काहींनी नेहाच्या हिंमतीचे कौतुक केले, तर काहींनी प्रभाकरच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला आणि दोन्ही पक्षांची चौकशी सुरू झाली. नेहाने आपल्या मुलीच्या भविष्यासाठी हा पवित्रा घेतल्याचे सांगितले. पण दुसरीकडे प्रभाकरने मात्र आरोप फेटाळले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावली

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

जरांगे-पाटील संधी साधूपणा करताय; भरत गोगावलेंचा टोला,शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांवरून राजकारण तापलं!

SCROLL FOR NEXT