Express train Saam Tv
देश विदेश

चहाची तलप आवरेना! आवडता चहा पिण्यासाठी लोको पायलटने चक्क थांबवली ट्रेन

साम टिव्ही ब्युरो

पाटणा : भारतात असंख्य चहाप्रेमी आहेत. चहासाठी (Tea addiction) लोक काहीही करायला तयार होतात. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. आवडता चहा पिण्यासाठी ट्रेनच्या लोको पायलटने (Train loco pilot) चक्क ट्रेनच थांबवल्याची घटना सिवानमध्ये (siwan) घडली आहे. यावेळी लोको पायलटने चहाचा आनंद घेतला खरा, पण त्याच्यामुळे शेकडो प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, 11123 क्रमांकाची डाउन झांसी एक्सप्रेसच्या लोको पायलटने सिसवन ढालावर ट्रेन थांबवली. यावेळी दोन्ही बाजूचे फाटक बंद होते. त्यामुळे एकीकडे ट्रेनमधील प्रवाशांना ताटकळत वाट पाहावी लागली आणि दुसरीकडे रस्त्यावर थांबलेल्या लोकांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली. काहीवेळानंतर गार्ड चहा घेऊन आला, तेव्हाच फाटक उघडले गेले.

रुग्णवाहिका ट्रॅफिक जाममध्ये अडकली

ट्रेन जात असताना सिसवन ढाला येथेही ट्रॅफिक जाम झाला होता. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सिसवनच्या बाजूने रुग्णवाहिकेतून रुग्णाला उपचारासाठी नातेवाईक घेऊन येत होते, मात्र फाटक बंद असल्याने रुग्णवाहिका ट्रॅफिक जाममध्ये अडकली. याप्रकरणी स्टेशन अधीक्षक अनंत कुमार यांनी माहिती घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT