Accenture Saam TV
देश विदेश

Accenture Layoff : आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर मंदीचं वादळ; Accenture कंपनीच्या १९,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या

कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २.५ टक्के कर्मचारी कामावरून कमी केले जाणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Accenture : आयटी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एक्सेंजर (Accenture) कंपनी संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. या कंपनीने तब्बल १९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी कंपनीने हा निर्णय जाहीर केला. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २.५ टक्के कर्मचारी कामावरून कमी केले जाणार आहेत. (IT Company)

जगावर मंदीच सावट

टेक कंपन्यांमध्ये सातत्याने नोकर कपात होत आहे. या आधी अॅमेझॉन कंपनीने देखील ९००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. टेक कंपन्या गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आपल्या कर्मचाऱ्यांना कमी करताना दिसत आहेत. त्यामुळे मंदीचे सावट असल्याचं म्हटलं जात आहे.

वाढत असलेली महागाई, वाढते व्याजदर तसेच मागणीची मंदी असल्याने आयटी क्षेत्रात लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. Cognizant ही Accenture ची प्रतिस्पर्धी कंपनी आहे. या कंपनीने काही महिन्यांपूर्वीच व्यवहारांमध्ये कशी घट सुरू आहे हे सांगितले आहे. याला कारणीभूत असलेल्या गोष्टींवर देखील त्यांनी भाष्य केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT