Petrol Diesel Latest Price Saam TV
देश विदेश

Maharashtra Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागले; नवीनतम दर तपासा

Petrol Price Today 17 June: भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात.

Shivani Tichkule

Petrol Diesel Price News: आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. त्यातच आता देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात.  (Latest Marathi News)

महाराष्ट्रात (Maharashtra) पेट्रोल ५५ पैशांनी तर डिझेल ५३ पैशांनी महागलं आहे. हिमाचल प्रदेश आणि गोव्यातही पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. पंजाबमध्ये आज पेट्रोल (Petrol) ६० पैशांनी आणि डिझेल ५८ पैशांनी स्वस्त झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोलच्या दरात ४६ पैशांची तर डिझेलच्या (Diesel) दरात ४३ पैशांची घसरण झाली आहे. गुजरातमध्येही पेट्रोल स्वस्त झाले आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, राजस्थान, तामिळनाडूमध्येही इंधनाचे दर घसरले आहेत. दुसरीकडे तेलंगणात पेट्रोल १.४८ रुपयांनी तर डिझेल १.३९ रुपयांनी महागले आहे. 

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update : दसऱ्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये सोने खरेदीसह वाहनांची विक्री देखील सुसाट

Dussehra Special : महाराष्ट्रातील 'या' गावात होते चक्क रावणाची पूजा, नेमकी प्रथा आहे तरी काय? पाहा व्हिडिओ

Walmik Karad: पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले; बीडमध्ये राजकीय खळबळ|VIDEO

Nifad News : अतिवृष्टीने द्राक्ष बागांचे नुकसान; शेतकरी आक्रमक, वनिता नदीत उतरून आंदोलन

Maratha Aarakshan : सरकारने आरक्षण दिलेय, पण खुर्चीसाठी काही..., मुंडेंचा जरांगेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

SCROLL FOR NEXT