Gold Silver Price Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price : सोन्याच्या भावात ४४० रुपयांनी वाढ; चांदीचा दरही उंचावला, तपासा आजचे दर

Gold Silver Rate In Maharashtra : महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. नोंद झाल्यानुसार सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली होती परंतु, सोन्याचा भाव हा ६१ हजारांवरच होता.

गुड रिर्टन्सच्या वेबसाइट्सनुसार आज सराफ बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा (Gold) भाव 55,850 रुपये आणि 24 कॅरेट  सोन्याचा (Gold) 10 ग्रॅमचा भाव 60,930 रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव 76,800 रुपये प्रति किलो झाला आहे. (1st June 2023 Update )

चांदीच्या दरात तेजी दिसून आली असून एक किलो चांदीचा भाव ४२०० रुपयांनी वाढून ७६,८०० रुपयांवर पोहोचला आहे. एक दिवसापूर्वी चांदीचा भाव ७२,६०० रुपये प्रति किलो होता.

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,310 रुपये

दिल्ली - 60,930 रुपये

हैदराबाद - 60,760 रुपये

कोलकत्ता - 60,760 रुपये

लखनऊ - 60,930 रुपये

मुंबई - 60,760 रुपये

नागपूर - 60,760 रुपये

पुणे - 61,760 रुपये

2. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी (Silver), जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

3.   हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT