Gold Silver Price Hike Saam tv
देश विदेश

Gold Silver Price Hike : सोनं महागलं ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Silver Price In Maharashtra : काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव हा दीड हजार रुपयांनी वाढला होता तर परवा ४५० रुपयांना कमी झाला होता.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : गुढीपाडव्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव हा दीड हजार रुपयांनी वाढला होता तर परवा ४५० रुपयांना कमी झाला होता.

शुक्रवारी नोंद झालेल्या सराफ बाजारात सोन्याचा भाव हा 62 हजार पार झाला होता. काल सोन्याचे भाव पुन्हा वाढले होते तर सकाळच्या दरानुसार आज पुन्हा दरात १०० रुपायांनी वाढ झाली आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार (Website)  22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,700 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,850 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदीचा दर 781 रूपये आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. (Gold Silver Price update 10th May 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 62,400 रुपये

दिल्ली - 62,000 रुपये

हैदराबाद - 61,850 रुपये

कोलकत्ता - 61,850 रुपये

लखनऊ - 62,000 रुपये

मुंबई -61,850 रुपये

नागपूर - 61,850 रुपये

पुणे - 61,850 रुपये

2. काल सकाळचे दर

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,750 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदीचा दर 781 रूपये आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. (Gold Silver Price update 9 May 2023)

3.  हॉलमार्कचे (Hallmark)  सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT