Jahangirpuri Violence Saam Tv
देश विदेश

जहांगीरपुरी परिसरात मोठा फौजफाटा तैनात; आरोपींच्या अवैध मालमत्तांवर चालणार 'बुलडोजर'

अवैध अतिक्रमणे पाडण्याच्या कारवाईसाठी अतिरिक्त सुरक्षा पुरवली

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: दिल्ली पोलिसांचे विशेष सीपी कायदा आणि सुव्यवस्था दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, जहांगीरपुरीतील (Jahangirpuri) संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन, आम्ही अवैध अतिक्रमणे पाडण्याच्या कारवाईसाठी अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे.

दिल्लीतील (Delhi) जहांगीरपुरी येथील हिंसाचारग्रस्त भागात काही स्थानिक लोक स्वतःच आपले सामान काढून घेत आहेत. रद्दी वस्तू आणि टाकाऊ वस्तू जमा करून ते इतर ठिकाणी पाठवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 'हे सामान विकून आम्ही घर चालवतो, आता इथून बुलडोझर येणार असल्याची माहिती मिळाल्याने इथून हटवले जात आहे,' असेही ते म्हणाले.

हे देखील पहा-

डीसीपी उषा यांनी जहांगीरपुरीची पाहणी केली

एमसीडीने जाहीर केलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेपूर्वी, डीसीपी उत्तर पश्चिम उषा रंगनानी यांनी जहांगीरपुरी परिसराची पाहणी केली. 16 एप्रिलच्या संध्याकाळी धार्मिक मिरवणुकीत दगडफेकीच्या घटना घडल्या. या परिसरात 500 हून अधिक पोलीस (Police) कर्मचारी आणि अतिरिक्त फौजांच्या 6 कंपन्या 24 तास तैनात करण्यात आल्या आहेत. अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांसह सशस्त्र एकूण 80 पथके तैनात करण्यात आली आहेत, असे पोलिसांनी सांगितले. संवेदनशील भागातील छतावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर केला जात आहे.

जहांगीरपुरीतील बेकायदेशीर बांधकामे हटवण्यासाठी एमसीडीच्या कारवाईवरून भाजप (BJP) गरीबांविरुद्ध युद्ध पुकारत असल्याचा आरोप एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. ओवेसी म्हणाले, 'कोणतीही नोटीस दिली नाही. कोर्टात जाण्याची संधी नाही'. एमसीडीने परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी सुमारे 400 पोलिसांची मागणी केली होती. यापूर्वी दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी महापालिकेच्या महापौरांना पत्र लिहून बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

दिल्लीतील अनेक भागात पोलिसांची गस्त

राजधानी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जामा मशीद, दर्या परिसरात गस्त घातली आहे. यादरम्यान पोलिसांनी सर्वसामान्यांना अफवांपासून दूर राहून शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT