IIT Mandi director controversial statement Saam Tv
देश विदेश

Himachal Pradesh News: लोक मांस खात असल्याने हिमाचलमध्ये ढगफुटी आणि भूस्खलनचा कहर, IIT संचालकांचं वादग्रस्त वक्तव्य

Viral Video: लोक मांस खात असल्याने हिमाचलमध्ये ढगफुटी आणि भूस्खलनचा कहर, IIT संचालकांचं वादग्रस्त वक्तव्य

Satish Kengar

IIT Mandi director controversial statement:

हिमाचल प्रदेशात पावसाचा मोठा कहर पाहायला मिळाला आहे. ढगफुटी आणि भूस्खलनमुळे अनेक लोकांचं प्रचंड नुकसान देखील झालं आहे. या पावसाळ्यात 238 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याआपत्तीनंतर आता आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

बेहरा म्हणाले आहेत की, हिमाचलमध्ये हा विनाश मांसाहारामुळे झाला आहे. ते म्हणाले की, हिमाचलमध्ये प्राण्यांवर होणाऱ्या क्रूरतेमुळे ढगफुटी होत आहे. त्यांनी मुलांना मांस न खाण्याची शपथ घेण्यास सांगितलं आहे. याचाच एका व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

आयआयटीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा म्हणाले की, ''जर आपण प्राण्यांची हत्या थांबवली नाही, तर हिमाचल प्रदेशचा नाश होईल. तुम्ही प्राण्यांची हत्या करत आहात, त्या प्राण्यांचे पर्यावरणाशी नाते आहे. ते नातं तुम्हाला बघता येत नाही.'' (Latest Marathi News)

ते पुढे म्हणाले, प्राण्यांवरील क्रूरतेमुळे हिमाचलमध्ये भूस्खलन आणि ढग फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. लोक मांस खात आहेत. लक्ष्मीधर बेहरा यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये ते म्हणताना दिसत आहे की, 'चांगली व्यक्ती बनण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? तुम्हाला मांस खाणे बंद करावे लागेल. यानंतर ते विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घेण्यास सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Designs: १०० ते १५० रूपयांमध्ये खरेदी करा युनिक आणि आकर्षक डिझाईन्सचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Maharashtra Live News Update: भाजप आमदार सुरेश धस यांनी गायले गीत

Puffy Eyes Morning: सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती सूज दिसतेय? किडनीच्या समस्येची ही गंभीर सुरुवात असू शकते

आखाती युद्धाचा परिणाम! डॉलरसमोर रुपया कोसळला; 95.22 वर ऐतिहासिक नीचांक|VIDEO

Viral news: समुद्र किनाऱ्यावर घडली मोठी दुर्घटना; अंघोळीला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT