Lakshadweep Tourism Saam Tv
देश विदेश

PM मोदींच्या भेटीनंतर लक्षद्वीपचं नशीबच पालटलं, पर्यटनात तब्बल ३४०० टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा

Lakshadweep : लक्षद्वीपला पर्यटनाला जाणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. पंतप्रधान मोदींनी पर्यटकाना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते.

Bharat Jadhav

Lakshadweep Tourism Increase :

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या लक्षद्बीप भेटीनंतर पर्यटनात कमालीची वाढ झालीय. लक्षद्वीपच्या पर्यटनात ३,४००% ची वाढ झाल्याचा दावा मेक माय ट्रीप या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीने केलाय. मेक माय ट्रीपने दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटवर केंद्रशासित प्रदेशचा शोध तब्बल ३,४०० टक्क्यांनी वाढलाय. लक्षद्वीपमध्ये बुकिंगसाठी गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात कॉल झाल्याचं वृत्तही ऑल इंडिया टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटर असोसिएशन दिलं होतं.(Latest News)

लक्षद्वीपला (Lakshadweep ) पर्यटनाला (Tourism) जाणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागलीय. पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. पंतप्रधान मोदींनी कोची-लक्षद्वीप बेटांच्या पाणबुडी ऑप्टिकल फायबर कनेक्शनसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी तेथील समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान मोदींनी पर्यटकाना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींचे फोटो इंटरनेटर खूप व्हायरल झाले. मोदींच्या भेटीनंतर लक्षद्वीपशी संबंधित गुगल सर्चमध्ये वाढ झालीय. इतकेच नाही तर . Google Trends नुसार लक्षद्वीप, दिल्ली ते लक्षद्वीप, आणि लक्षद्वीपला जाणार्‍या फ्लाइट्स यासारख्या शोधांमध्ये वाढ झाली.

मोदींच्या या भेटीनंतर मालदीवच्या राजकारण्यांनी पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यानंतर भारतात बॉयकॉट मालदीव ट्रेंड सुरू झाला. अनेक सेलिब्रिटींनी लक्षद्वीपच्या पर्यटनाला पाठिंबा दर्शवला. सोमवारी EaseMyTrip या भारतीय ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीने जाहीर केले की त्यांनी मालदीवच्या फ्लाइटसाठी सर्व बुकिंग निलंबित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Varsha Usgaonkar: वर्षा उसगांवकरांचा जन्मभूमीवर खास बहुमान; गोवा राज्य चित्रपट महोत्सवात 'या' पुरस्काराने सन्मानित

Screen time effects on kids: वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय चिडचिडेपणाची समस्या; कसं कराल स्क्रीन टाईम मॅनेजमेंट?

Maharaja Palace History: शाही घराण्याचा गौरव, सांस्कृतिक वारसा असलेल्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक पॅलेसची माहिती

अरबी समुद्रात वाऱ्याने दिशा बदलली, मुंबईत पावसाचं रौद्ररूप, IMD कडून रेड अलर्ट, शाळाही बंद

SCROLL FOR NEXT