Lakhimpur: हिंसाचार प्रकरणातील मंत्रिपुत्राला तीन दिवसांची पोलीस कोठडी  Saam Tv
देश विदेश

Lakhimpur: हिंसाचार प्रकरणातील मंत्रिपुत्राला तीन दिवसांची पोलीस कोठडी

हिंसाचाराच्या प्रकरणात मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. आशिषला लखीमपूरच्या सीजेएम न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीकरिता नेमण्यात आलेले विशेष तपास पथक सखोल चौकशी करणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे आशिष मिश्राला एसआयटीने न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

आशिष मिश्राच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी अधिकाऱ्यांनी चौकशीकरिता केली होती. पण ३ दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. वकील एसपी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार की, आशिष मिश्राच्या ३ दिवसांच्या कोठडीसंदर्भात काही अटी घालून देण्यात आले आहेत. १४ दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मागणीकरिता पोलिसांनी अर्ज दिला होता. सुनावणीत काही वेळासाठी व्यत्ययही आला होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी सुरू असल्याने व्यत्यय आल्याची माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आशिष मिश्राची फक्त १२ तास चौकशी होऊ शकली आहे. ज्यामध्ये त्याने उत्तरे दिली नाहीत. म्हणून त्याला १४ दिवसांच्या कोठडीत ठेवणे आवश्यक आहे. पण आता न्यायालयाने १४ दिवसांऐवजी ३ दिवसांची कोठडी सुनावली आहे. आशिषच्या वकिलांनी सांगितले की, पोलिसांकडे आशिषला विचारण्यासारखे फक्त ४० प्रश्न होते, ते त्यांनी विचारले आहेत. १२ तासांच्या चौकशी दरम्यान फक्त एकदा पाणी प्यायला दिले आहेत. न थांबता सातत्याने चौकशी सुरू होती, प्रश्न विचारले जात होते, पण उत्तरे दिली जात नव्हती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT