Kulhad Pizza Couple MMS Leak Saam TV
देश विदेश

Kulhad Pizza Couple MMS Leak: सिक्योरिटी पासवर्ड असूनही प्रायव्हेट व्हिडीओ लीक कसा होतो? बचावासाठी घ्या ही काळजी

How To Protect Privet Data: आपले खासगी क्षण लिक झाल्याने या दोघांनीही पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Kulhad Pizza Couple:

कुल्हाड-पिझ्झा म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका जोडप्याचा खासगी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लिक झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर जोडप्याचं टेंन्शन वाढलंय. आपले खासगी क्षण लिक झाल्याने या दोघांनीही पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर खासगी फोटो किंवा व्हिडीओ लिक होण्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. यामुळे जोडप्यांची बदनामी होते. झालेल्या प्रकरणातून सावरण्यासाठी बराच काळ जातो. समाजात नाचक्की होते. खासगी गोष्ट लिक होऊ नयेत यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपल्या माहित असणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टीटी काळजी घ्यावी, कोणत्या चूका टाळाव्यात याची माहिती जाणून घेऊ.

जुना फोन विकताना हे काम आधी करा

बऱ्याच ठिकाणी फोन विक्रीवर ऑफर दिल्या जातात. काही जण आपला जूना फोन खराब झाला की तो विकून नविन फोन खरेदी करतात. नवीन फोन खरेदी केल्यावर जूना फोन समोरच्या व्यक्तीला देण्याआधी आपला सर्व डाटा त्यातून काढून घ्या. तुमचे लॉगइन आयडी पासवर्ड लॉगआउट करा. जर तुमची माहिती समोरच्या व्यक्तीच्या हाती लागली तर त्याचा दुरउपयोग होण्याची जास्त शक्यता असते.

थर्ड पार्टी अॅप

व्हिडीओ लिक होण्यामागे थर्ड पार्टी अॅप असतात असे अनेक वेळा समोर आले आहे. थर्ट पार्टी अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध असतात. यामध्ये मोठमोठ्या स्कीम, गिफ्ट्स, कॅशबॅक दिल्या जातात. मात्र इथे तुम्हाला फ्रीमध्ये काहीही दिले जात नाही. त्यामुळे या व्यक्ती ओटीपी तसेच विविध गोष्टीतून तुमच्या फोनमधील डेटा त्यांच्या फोनमध्ये घेतात.

क्लाउडपासून सावधान

आपल्या गॅलरीमध्ये स्टोअरेज फूल झाल्याने बऱ्याच व्यक्ती फोटो डिलेट करतात. मात्र बॅकअपसाठी जीमेल किंवा क्लाउड्समध्ये फोटो सेव करतात. फोन चोरीला गेल्याने किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून फोन हॅक करून क्लाउड्समधील माहिती लिक होण्याची शक्यता असते.

चुकूनही या चुका करू नका

तुमच्या फोनचे पासवर्ड कोणत्याही मित्र मैत्रिणीला पाठवू नका.

कोणतेही अॅप थेट गुगलवरून लिंकच्या सहाय्याने ओपन करू नका.

न आवडलेलं अॅप अनइन्सटॉल करताना दिलेले एक्सेस बंद करा.

फोनचा पासवर्ड कुठेही लिहून ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

Flesh-Eating Screwworm: अमेरिकेत मांस खाणाऱी माशी? नरभक्षक माशी संपवणार माणूस?

Horoscope: गोड बातमी मिळेल,लॉटरी लागणार; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल आनंदाचा

Maharashtra Live News Update: भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

SCROLL FOR NEXT