Rss KRK News Saam TV
देश विदेश

KRK RSS News: KRK ला करायचाय RSS जॉईन, भागवतांकडे व्यक्त केली इच्छा; चर्चांना उधाण

KRK सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. मागील काही दिवसांपुर्वीच एका वादग्रस्त ट्विटमुळे त्याला तुरुंगात जावं लागलं होतं.

Jagdish Patil

KRK Joining RSS: कमाल आर खान म्हणजे केआरके सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. मागील काही दिवसांपुर्वीच त्याने केलेल्या एका वादग्रस्त ट्विटमुळे तुरुंगात देखील जायला लागलं होतं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आता आणखी एक नवं ट्विट केल्यामुळे केआरके (Kamaal R. Khan) प्रचंड चर्चेत आला आहे.

जगातील सर्वात मोठं संघटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये (RSS) येण्याची इच्छा व्यक्त करणार त्याने सध्या एक ट्विट (Tweet) केलं आहे. एवढंच नव्हे तर आरएसएस ला माझी गरज असेल तर मी संघात यायला तयार आहे असं देखील तो आपल्या ट्विटमध्ये म्हटला आहे.

केआरकेने आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, 'आदरणीय डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat), जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला माझी गरज असेल तर मी संघात येण्यासाठी तयार आहे' असं ट्विट केआरकेने केलं आहे. महत्वाचं म्हणजे त्याने हे ट्विट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

पाहा व्हिडीओ -

केआरके आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो. याआधी देखील त्याने आपणाला राजकारणात यायचं असल्याचं ट्विट केलं होतं. दरम्यान, केआरकेवर आपल्या जिम ट्रेनरसोबतशी गैरवर्तन केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

शिवाय बॉलिवूडमधील अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी प्रकरणी त्याला तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. अशातच आता त्याने केलेल्या नव्या ट्विटमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT