Kolkata Doctor Death Case Saam Digital
देश विदेश

Kolkata Doctor Death Case : कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मृत्यूच्या वेळेबाबत मोठी माहिती समोर

Kolkata Doctor Death Case Update : कोलकाता डॉक्टरवरील अत्याचार आण खून प्रकरणाचा गुंता वाढतच चालला आहे. आता शवविच्छेदन अहवाल आणि स्मशानभूमीने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र यामध्ये मृत्यूच्या वेळेत तफावत आढळली आहे.

Sandeep Gawade

कोलकाता येथे डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. मात्र या प्रकरणाचा गुंता वाढतच चालला आहे. आता पीडितेच्या मृत्यूच्या वेळेवरून वाद निर्माण झाला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि स्मशानभूमीने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र यामध्ये मृत्यूच्या वेळेत तफावत आढळली आहे.

कोलकाता आरजी कार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणाचा अद्यापही छडा लागलेला नाही. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे, मात्र आतापर्यंत सिव्हिल वॉलेंटियर संजय रॉय वगळता कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, डॉक्टरांच्या मृत्यूबाबत तपासात सातत्याने तफावत समोर येत आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीतून देण्यात आलेल्या मृत्यू प्रमाणपत्रावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.

९ ऑगस्टला सकाळी आरजी कारच्या सेमिनार रूममध्ये डॉक्टरांचा मृतदेह सापडला होता. सायंकाळी ही बातमी त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरजी कारच्या ज्युनियर डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलं. फॉरेन्सिक तपासणीनंतर त्याच दिवशी पीडितेचे पोस्टमार्टम करण्यात आलं. त्यानंतर रात्री मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच रात्री अंत्यसंस्कार झाले.

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार पीडितेचा मृत्यू 9 ऑगस्टला पहाटे 3 ते 6 च्या दरम्यान झाला. आता पिडीतेवर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या पाणिहाटीच्या स्मशानभूमीच्या रजिस्टरमध्ये 'मृत्यूची वेळ दुपारी 12:44 वाजताची नोंद करण्यात आली आहे. टीव्ही ९ हिंदीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT