कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार.
मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आसून विविध ठिकाणी निषेध आंदोलन सुरू आहेत. या घटनेचा तपास कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे.
दरम्यान, देशात महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. देशभरात आंदोलने होत असून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली जात आहे. पीडित महिला आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होती.
हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये तिच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. पीडित कुटुंब आणि आंदोलकांनी हा गुन्हा सामूहिक बलात्कार असल्याचा आरोप केला आहे. सर्व दोषींची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मृत्यूपूर्वी पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये झाली आहे.
बलात्कार आणि हत्येचा खटला सीबीआयकडे सोपवताना उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, या प्रकरणासंदर्भात आधी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. संदीप घोष यांची चौकशी व्हायला हवी होती. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तपासाचा स्टेटस रिपोर्ट सादर करण्यास सांगितले होते. माजी मुख्याध्यापकांचे जबाब नोंदवण्यास झालेल्या विलंबावरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आंदोलक डॉक्टरांच्या चिंता दूर करण्यासाठी राज्य सरकार काय करत आहे, अशी विचारणा केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.