Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price Today : 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले; वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

Ruchika Jadhav

Petrol Diesel : जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमती शुक्रवारी सकाळी जाहीर झाल्या आहेत. आजच्या समोर आलेल्या सरकारी तेल कंपन्यांच्या दरानुसार, अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झाला आहे. मात्र चेन्नई, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या शहरांमध्ये किमतीत फार बदल झालेला नाही. (Latest Marathi News)

सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार, आज हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये पेट्रोल 34 पैशांनी महागले आहे. पेट्रोलचे दर 96.84 रुपये प्रति लीटर आहेत, तर डिझेल 33 पैशांनी महागले आहे. आज डिझेलची किंमत 89.72 रुपये प्रति लिटर इतकी आहे. बिहारची राजधानी असलेल्या पटनामध्ये पेट्रोलचे दर 53 पैशांनी तर डिझेलचे दर 50 पैशांनी वाढले आहे. पेट्रोल 108.12 रुपये प्रति लिटरवर पोहोचले असून डिझेल 94.86 रुपये प्रति लीटर इतके आहे.

या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल गुरुग्राममध्ये पेट्रोल 96.84 रुपये प्रति लिटर झाले असून, डिझेल 89.72 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. पाटणामध्ये पेट्रोल 108.12 रुपये प्रति लिटर झाले असून, डिझेल 94.86 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत?

मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर असून डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 96.65 रुपये प्रति लिटर असून डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर असून डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर असून डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast: विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

SCROLL FOR NEXT