brother saves sibling Saam
देश विदेश

Viral : होता थोरला म्हणून वाचला धाकटा! मृत्यूच्या दाढेतून भावाला ओढून काढलं; व्हायरल व्हिडिओ एकदा बघाच

viral videos today : केरळमधील मलप्पुरम येथे छतावरून पडणाऱ्या धाकट्या भावाला मोठ्या भावाने हवेतच पकडून जीव वाचवल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Namdeo Kumbhar

brother saves sibling from falling roof viral video : लहान भाऊ छप्पर साफ करताना अचानक खाली कोसळला, खाली उभ्या असलेल्या मोठ्या भावाने एका क्षणाचाही विलंब न करता त्याचा जीव वाचवला. दोन भावांचा हृदयस्पर्शी व्हडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ केरळमधील मलप्पुरममधील असल्याचे समजतंय. छप्पर साफ करताना धाकटा भाऊ अचानक घसरून खाली पडू लागला. पण खालीच उभ्या असलेल्या मोठ्या भावाने क्षणाचाही विलंब न करता त्याला हवेत कॅच करत पकडले. आणि मोठा अपघात टळला. थोरल्या भावाच्या प्रसंगावधानाने धाकट्या भावाचा जीव वाचला आहे.

केरळमधील मलप्पुरममध्ये घडलेला हा प्रसंग खूपच हृदयद्रावक आणि थरारक आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एका मोठ्या भावाच्या प्रसंगावधानाने लहान भावाचा जीव वाचला आहे. याची सर्वत्र चर्चा असून भावांच्या प्रेमावर प्रत्येकजण आपले मत नोंदवत आहे. दोन भावांमधील प्रेम चांगले आणि घट्ट असतेच. पण बायका आल्यानंतर त्याला तडा जातो, अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीने दिली आहे. पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ...

नेमकं काय झालेले?

मलप्पुरममधील २ भाऊ घरावरील छताची साफसफाई करत होते. धाकटा भाऊ छतावर चढून कचरा काढत हता. छतावरील कचरा साफ करताना धाकट्याचा पाय घसरतो अन् तोल जातो. अचानक पाय घसरल्यामुळे धाकटा भाऊ वेगाने छतावरून खाली कोसळू लागला. पण त्याच वेळी मोठा भाऊ खाली उभा होता. छतावरून पडणाऱ्या भावाला पाहून मोठा भाऊ जराही डगमगला नाही. त्याने कोणताही विचार न करता धावत जाऊन, जमिनीवर पडण्यापूर्वीच आपल्या धाकट्या भावाला हवेतल्या हवेत कॅच केले.

अपघात टळला, जीव वाचला -

मोठ्या भावाने धाकट्याला खाली पडू दिले नाही. जर मोठ्या भावाने पकडले नसते तर धाकटा भाऊ थेट सिमेंटच्या जमिनीवर डोक्यावर पडला असता. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली असती. डोक्याला जबर मार लागला असता तर त्याचा जीवही गेला असता. थोरल्या भावामुळे जीव वाचला. हा सर्व प्रकार एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ पाहून नेटकरी मोठ्या भावाचे कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' चे बॉक्स ऑफिसवर वादळ; रितेश देशमुखच्या ऐतिहासिक चित्रपटाची रविवारी बक्कळ कमाई, वाचा कलेक्शन

Maharashtra News Live Update: हिंगोलीत 48 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू

Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये चाललंय काय? ७० नगरसेवक अचानक संपर्काबाहेर, राज्यातील राजकारणात मोठी खळबळ

पुणे हादरले! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे हस्तमैथुन; तरुणीने व्हिडिओ बनवला अन्...

PM Kisan Yojana: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता; तुमचे नाव तर नाही ना?

SCROLL FOR NEXT