Kerala Accident  Saam tv
देश विदेश

Kerala Accident: जीप उलटून २५ मीटर खोल दरीत कोसळली, दोन तुकडे झाले; भीषण अपघातात महिलांसह ९ जणांचा मृत्यू

Kerala Accident : वायनाडमध्ये जीप दरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Wayanad Jeep Accident News: केरळच्या वायनाडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. वायनाडमध्ये जीप दरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण केरळ राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या वायनाडमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जीप चालकाचाही मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर झाले आहेत. जीप उलटून २५ मीटर खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे.

वायनाडमधील हा भीषण अपघात आज शुक्रवार साडेचार वाजता झाला आहे. या जीपमध्ये एकूण १३ प्रवासी होते. या अपघातात मृत्यू झालेल्या ६ जणांची ओळख पटली आहे. राणी, संती, चिन्नम्मा, लीला, राबिया आणि शीजा अशी मृतांची नावे समोर आली आहेत. हे सर्वजण थलप्पुझाजवळील मक्कीमाला येथील राहणारे आहेत.

या जीपमधून कामगारांना घेऊन जात असताना भीषण अपघात झाला आहे. भीषण अपघातात जीपचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. जीप उलटून दरीत कोसळल्यानंतर तिचे दोन तुकडे झाले आहेत. अपघात झाल्यानंतर काही कामगारांनी जीपजवळ धाव घेतली, त्यानंतर पाच जणांचा मृत्यू झाल्याचे दिसले. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातातील सर्व मृत हे वायनाड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.

तत्पूर्वी, या भीषण अपघातातील जखमींना उपचारासाठी वायनाड येथील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. थविंजल पंचायत अध्यक्ष एल्सी जॉय आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी मृतांची पुष्टी केली.

अपघातानंतर राहुल गांधी यांचं ट्विट

दरम्यान, वायनाडमधील भीषण अपघातानंतर तेथील स्थानिक खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे. राहुल गांधी म्हणाले, 'मनंतवाडी, वायनाड येथील चहाच्या मळ्यातील अनेक कामगारांचा जीप अपघातात मृत्यू झाला, या दुर्घटनेने खूप दुःख झाले'.

'या अपघातासंदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्वरित मदत करण्याचे आवाहन केले आहे. माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवो ही सदिच्छा, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT