Kerala Crime Saam Tv
देश विदेश

Shocking News : मैत्रीच्या आडून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; नौदल कर्मचाऱ्यानं केला १५ वर्षीय मुलीवर बलात्कार

Kerala Crime News : केरळच्या कोची येथे नौदल कर्मचाऱ्याकडून १५ वर्षीय CISF अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • केरळच्या कोची मध्ये १५ वर्षीय मुलीवर बलात्कार

  • आरोपी नौदलाचा कर्मचारी असल्याचे उघड

  • प्रेमसंबंधांच्या जाळ्यात ओडून मुलीवर अत्याचार

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली

केरळमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. केरळच्या कोची येथे एका नौदलाच्या कर्मचाऱ्याने १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महत्त्वाचं म्हणजे पीडित मुलगी CISF अधिकाऱ्याची मुलगी असून मूळची राजस्थानची आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. तसेच या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना १७ नोव्हेंबर रोजी आरोपी राहत असलेल्या भाड्याच्या घरात घडली. आरोपी आणि पीडित मुलीमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. या मैत्रीतून विश्वास संपादन करून तरुणाने तरुणीला विश्वासात घेतले आणि प्रेमसंबंधांच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केले. सुरुवातीला पीडितेने नकार दर्शवला मात्र आरोपीने मुलीला धमकी देत अत्याचार केले.

याप्रकरणी पोलिसांनी मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे अमितला अटक केली. त्याच्यावर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय आरोपीला एर्नाकुलम प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

SNCने म्हटले आहे की, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. कायदा अंमलबजावणी आणि शिस्तीसाठी जबाबदार असलेले नौदल प्रोव्होस्ट तपासावर लक्ष ठेवत आहेत. संपूर्ण तपास आणि निष्पक्ष कायदेशीर निकाल सुनिश्चित करण्यासाठी कमांडने नागरी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीला काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : सिंधुदुर्गमध्ये लपलेला स्वर्ग; निसर्ग सौंदर्याने सजलाय 'हा' किनारा, बोटीतून करा सफर

ajit pawar plane crash : अजितदादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा; तटकरेंची मागणी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा

इथे कचरा का टाकला? तरुणांची तुंबळ हाणामारी, एकावर धारदार शस्त्राने वार, VIDEO

मराठमोळी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सलमान खान, इम्रान हाश्मीसोबत केलंय काम, सिनेसृष्टीवर शोककळा

Shocking: बायकोने नवऱ्याच्या अंगावर ओतलं ५ लिटर उकळतं तेल, लग्नानंतर १० व्या दिवशी भंयकर घडलं

SCROLL FOR NEXT