देश विदेश

Kerla Blast News : केरळमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, २० जण जखमी

Kerla News : सध्या तरी नेमका हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती समोर आलेली नाही.

प्रविण वाकचौरे

Kerla News :

केरळमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. एर्नाकुलममधील कलामासेरी येथील एका सभागृहत खिश्चन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा मेळावा सुरु असतानाच इथे मोठा स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या तरी नेमका हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती समोर आलेली नाही. केरळ पोलिसांकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेले नाही. सकाळी स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक लोकांसह मदत आणि बचावकार्य सुरू केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तीन दिवसीय कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस असल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्फोट झाला तेव्हा सभागृहात दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. दरम्यान एकापाठोपाठ एक ३-४ स्फोट झाल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. ज्यात अनेक लोक जखमी झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा देखील वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे. आम्ही घटनेचा तपशील गोळा करत आहोत. सर्व उच्च अधिकारी एर्नाकुलममध्ये आहेत. डीजीपी घटनास्थळी जात आहेत. आम्ही प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत आहोत. मी स्वत: डीजीपींशी बोललो आहे. तपासानंतर आम्हाला अधिक तपशील मिळतील, असं केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT