Kedarnath Temple  Saam Tv
देश विदेश

आजपासून भाविकांसाठी केदारनाथ मंदिर खुले; पहाटेपासूनच दर्शनासाठी हजारोंची गर्दी

अनेकांचे श्रद्धास्थान असणारे केदारनाथाचे मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : अनेकांचे श्रद्धास्थान असणारे केदारनाथाचे (Kedarnath Temple) मंदिर आजपासून भाविकांसाठी (devotees) खुले करण्यात आले आहे. १२ ज्योतिर्लिंगांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे ६ महिन्यानंतर आज खुले करण्यात आले आहे. पहाटे ६ वाजून २५ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर मंत्रोच्चारात मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री (Uttarakhand Chief Minister) पुष्कर सिंह धामी या ठिकाणी उपस्थित होते.

हे देखील पाहा-

केदारनाथ मंदिर उघडण्याच्या वेळी १० हजार भाविक येथे उपस्थित होते. ६ महिन्यनंतर उघडलेल्या केदारनाथ मंदिराला फुलांची (flowers) सुंदर सजावट करण्यात आली आहे. याकरिता सुमारे १० क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला होता. आज मंदिर उघडण्याच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ येथे गुरुवारपासूनच भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात बघायला मिळत होती.

केदारनाथचे मंदिर हे उत्तर आणि दक्षिण भारतातील धार्मिक संस्कृतीचा संगम मानला जात असतो. गुरुवारी सकाळी गौरीकुंड येथून हजारो भाविक केदारनाथ धामकडे रवाना झाले होते. भाविकांनी येथून सुमारे २१ किमी अंतर पायी, घोडा किंवा पिठूने जात असतात. गुरुवारी सकाळी ६ वाजता सुरू झालेला प्रवास केदारनाथ धाम येथे सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास संपला. क्षमतेपेक्षा जास्त भाविकांनी गर्दी केल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती.

आज सकाळी सर्वांना केदारनाथला जाण्याची परवानगी देण्यात आली. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चार धाम यात्रेला सुरूवात झाली आहे. चार धाम यात्रेमध्ये केदारनाथ धामचे स्थान हे तिसरे आहे. गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर उघडण्यात आले. केदारनाथ मंदिर आज खुले करण्यात आले आहे. बद्रीनाथ मंदिर ८ मे दिवशी खुले करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT